Vasco chicken and mutton market  Dainik Gomantak
गोवा

Vasco: वास्कोतील चिकन, मटण विक्रेत्यांना नोटिसा! मार्केटमध्ये अस्वच्छता; बाजार निरीक्षकांना अहवाल देण्याचा निर्देश

Vasco chicken and mutton market : चिकन व मटण मार्केटातील अस्वच्छतेची दखल घेताना मुरगाव पालिकेने संबंधित विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Market : येथील चिकन व मटण मार्केटातील अस्वच्छतेची दखल घेताना मुरगाव पालिकेने संबंधित विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. हा परिसर अस्वच्छ असल्याने तेथे गंभीर आरोग्य व इतर समस्या निर्माण होऊ शकतात असे नोटिशीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

याप्रकरणी पालिका बाजार निरीक्षक, आरोग्य केंद्र अधिकारी, एफडीए अधिकाऱ्यांना तेथे नियमांचे पालन होते की नाही यासंबंधी दक्षता घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. येथील टी.बी. कुन्हा चौकापासून काही अंतरावर चिकन व मटण मार्केट आहे. तेथे वीस ते पंचवीस विक्रेते आहेत.

मात्र तेथे सुविधा असतानाही स्वच्छता ठेवण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याप्रकरणी नगराध्यक्ष गिरीश बोरकर, मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी इतर अधिकाऱ्यांसह १९ फेब्रुवारीला पाहणी केली होती.

त्यावेळी तेथे अस्वच्छता दिसून आली होती. या पाहणीनंतर तेथील विक्रेत्यांना पालिका कायदा १९६८ अंतर्गत मुख्याधिकारी नाईक यांनी कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. तेथे स्वच्छता सुनिश्र्चितीसाठी विक्रेत्यांनी भूगटार जोडणीसाठी अर्ज करावेत. जे विक्रेते जोडणीसाठी अर्ज करणार नाहीत, त्यांची पाणी व वीज जोडणी ना हरकत दाखला रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

पालिकेचे निर्देश

तेथे रोगराई टाळण्यासाठी तेथे आरोग्य केंद्राधिकारी आपल्या अधिकारीमार्फत नियमित तपासणी करू शकतात. एफडीए अधिकाऱ्यांनी या विक्रेत्यांना स्वच्छता व एफडीए परवाना नियमांचे पालन सुनिश्र्चित करावे. त्याचप्रमाणे पालिकेच्या बाजार निरीक्षकांनी तेथील स्वच्छतेसंबंधी निर्देशाचे पालन सुनिश्र्चित करून अहवाल द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT