Vasco Fish Market : 'पार्किंग व्यवस्थे'कडे होतेय दुर्लक्ष! वास्को नव्या 'मासळी मार्केट'कडे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

Vasco Fish Market Parking Issue: इमारतीच्या तळमजल्याखाली प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध असतानाही वाहनचालकांकडून तिचा वापर केला जात नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
Vasco Fish Market
Vasco Fish MarketDaink Gomantak
Published on
Updated on

Parking Issue at Vasco Fish Market : मुरगाव नगरपालिकेतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या आधुनिक मासळी मार्केट इमारतीच्या तळमजल्याखाली प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध असतानाही वाहनचालकांकडून तिचा वापर केला जात नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

परिणामी, वाहनचालक पूर्वीप्रमाणेच रस्त्याच्या दुतर्फा तसेच पदपथावर वाहने उभी करत असून त्यामुळे वाहतूक कोंडीसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मासळी मार्केटचे उद्‌घाटन सुमारे दहा दिवसांपूर्वी करण्यात आले असून ग्राहक व विक्रेत्यांच्या सोयीसाठी या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.

Vasco Fish Market
Goa Crime: नुवे घरफोडीत 'पारधी गँग'चा हात, मायणा कुडतरी पोलिसांनी मुंबईत आवळल्या एकाच्या मुसक्या

मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी तळमजल्याखाली दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ही सुविधा असूनही वाहनचालक पार्किंगमध्ये वाहने उभी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

Vasco Fish Market
Goa Municipal Election: महापालिका निवडणूक; बाबूश यांना घेरण्याची तयारी, विरोधकांची 'एकसंध' मोर्चेबांधणी; उत्पलकडे नजरा...

रस्त्याकडेला व पदपथावर वाहने उभी केल्यामुळे एकामागे एक दुचाकी उभ्या राहत असून त्यामुळे वाहन बाहेर काढणेही कठीण होत आहे.

तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुचाकी उभ्या असल्याने चारचाकी वाहनांना ये-जा करताना अडथळे निर्माण होत असून वाहतूक विस्कळीत होत आहे. संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com