Goa Carnival 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival 2025: वास्कोत कार्निव्हलची धामधूम! उद्या भव्य चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन; शहरातील वाहतुकीत बदल

Traffic Diversion In Vasco For Carnival: वास्को कार्निव्हल समितीतर्फे उद्या म्हणजेच सोमवारी (3 फेब्रुवारी) चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याने शहर भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Vasco Carnival Float Parade Traffic Diversion February 3

वास्को: वास्को कार्निव्हल समितीतर्फे उद्या म्हणजेच सोमवारी (3 फेब्रुवारी) चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याने शहर भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन

दरम्यान, चित्ररथ मिरवणुकीला सेंट अँड्यू चर्चसमोरुन आरंभ होऊन ती स्वातंत्र्यपथाने दामोदर मंदिर, जोशी चौक, बडोदाबँक मार्गाने पुढे जाईल. त्यासाठी वाहतुकीमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहे. वास्कोबाहेरुन येणारी चारचाकी वाहने तानिया हॉटेलसमोरच्या मोकळ्या जागेत उभी करण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सेंट जोसेफ वाझ मार्ग, दत्तात्रय देशपांडे मार्ग, स्वातंत्र्य पथ,एफ.एल गोम्स च्या अंतर्गत रस्त्यांवर चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्किंग सोय करण्यात आली आहे. दुपारी एक ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनाला प्राधान्य

कार्निव्हल आयोजकांनी गोव्यातील सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनाला प्राधान्य दिले आहे, गोवा पोलीस आणि आपत्कालीन सेवांच्या सहकार्याने एक व्यापक योजना लागू केली आहे. कार्निव्हलदरम्यान राज्यात तसेच कार्निव्हलच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापन काळजीपूर्वक केले जाईल, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT