Varun Dhawan in IFFI Dainik Gomantak
गोवा

Varun Dhawan in IFFI: इफ्फीच्या ग्रँड प्रीमियरमध्ये वरूण धवनचा 'लाईव्ह' परफॉर्मन्स

'भेडिया'तील गाण्यांसह देशभक्तीपर गाण्यांवर डान्स; महोत्सवात चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियरही होणार

गोमन्तक डिजिटल टीम

Varun Dhawan in IFFI: देशाचे पर्यटन केंद्र अशी ओळख असलेल्या गोव्यात ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (International Film Festival Of India) तयारीला आता वेग आला आहे. ताज्या माहितीनुसार आता या महोत्सवाच्या ग्रँड प्रीमियरमध्ये अभिनेता वरूण धवन परफॉर्म करणार असल्याचे समजते. (IFFI Goa 2022)

इफ्फिच्या तयारीसोबतच गेल्या काही दिवसात इफ्फी बाबतच्या नवनव्या अपडेट्स समोर येत आहेत. अभिनेता वरूण धवन याचा आगामी चित्रपट 'भेडिया' येत्या 25 नोव्हेंबर रोजी रीलीज होत आहे. पण त्यापुर्वीच गोव्यात होणाऱ्या या इफ्फीमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. आणि आता या चित्रपटातील गाण्यावर या महोत्सवाच्या ग्रँड प्रीमियरमध्ये वरूण धवन परफॉर्म करणार आहे.

याशिवाय देशभक्तीवर इतरही गाण्यांवर वरूणचा परफॉर्मन्स असणार आहे. अशा कार्यक्रमात वरूणचा स्टेजवरील वावर नेहमीच एनर्जेटीक राहिलेला आहे. त्यामुळे वरूणला लाईव्ह डान्स करताना पाहणे ही दर्शकांसाठी मेजवानी ठरणार आहे.

दरम्यान, 'भेडिया' या चित्रपटात वरूण अशा तरूणाची भुमिका साकारत आहे, ज्याच्यावर एका लांडग्याने हल्ला केलेला असतो. आणि त्यानंतर त्याच्या शरीरात बदल होऊन त्याचे रूपांतर लांडग्यामध्ये होत असते. अमर कौशिक दिग्दर्शित या हॉरर कॉमेडी चित्रपटात कृती सेननही मुख्य भुमिकेत आहे. हा चित्रपट 25 नोव्हेंबर रोजी रीलीज होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025: सिनेरसिकांसाठी 'इफ्फी'चा मेजवानी मोसम सुरू, पत्रकारांसाठी 'चित्रपट रसग्रहण' अभ्यासक्रम; 'FTII'चे आयोजन

World Cup 2025 Semifinal: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास 'या' संघाला मिळणार फायनलचं तिकीट, नियम वाचा

Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीसाठी 'बॅलेट पेपर'चा वापर, पाच कोटींचा होणार खर्च; मतदारयादीत नवी नावे जोडणे स्थगित

Goa Politics: 'माझे घर'ला 'खो' घालण्याचा यत्न, विरोधी आमदारांना धडा शिकवा; CM प्रमोद सावंतांचे जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT