Vishwajit Rane
Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

महिलांसाठी सरकारच्‍या विविध योजना : विश्‍‍वजीत राणे

दैनिक गोमन्तक

सासष्टी : सरकारच्या सर्व योजना घरोघरी पोहोचाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक कुटुंबाला दोन ते तीन योजनांचा लाभ मिळावा याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांसाठी अनेक योजना असून, त्‍यांचा त्‍यांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री विश्र्वजीत राणे यांनी सांगितले.

मडगावात भाजप महिला मोर्चातर्फे शनिवारी आयोजित महिला सशक्तीकरण अभियान संमेलनात राणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी आमदार उल्हास तुयेकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, पक्षाचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, महिला मोर्चाच्या राज्य अध्यक्षा आरती बांदोडकर यांचीही उपस्‍थिती होती. त्‍यांनी सरकारच्या महिलासाठींच्या अनेक योजनांची माहिती दिली. हे संमेलन सासष्‍टी तालुक्यातील महिलांसाठी आयोजित करण्यात आले होते.

मोदी दूरदृष्टीचे नेते

भाजप हा समाजाच्या तळागळात जाऊन काम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टीचे व महिलांच्या विकासाला चालना देणारे नेते आहेत. त्यांच्यामुळेच महिला व बालकल्याण तसेच आरोग्य खात्यामार्फत महिलांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्याची माहिती राणे यांनी दिली. दरम्‍यान, याप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा तसेच महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : उल्‍हास वेर्लेकर कुटुंबीयांकडून विविध संस्‍थांना १० लाखांची देणगी; लग्नाच्या वाढदिनी भेट

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा

Agonda News : मुडकूड-आगोंदच्या समस्या सुटणार; सभापती तवडकर यांची ग्वाही

Summer Camp : रवींद्र भवन मडगाव आयोजित उन्हाळी शिबिराला प्रतिसाद

इस्रोने रचला इतिहास, 3D प्रिंटेड लिक्विड रॉकेट इंजिनची चाचणी केली यशस्वी

SCROLL FOR NEXT