Varca murder case  Dainik Gomantak
गोवा

वार्का येथील वृद्धाचा खून जमीन व्यवहारातून?

प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी याबाबत तूर्त तरी मौन पाळले आहे

दैनिक गोमन्तक

मडगाव : वार्का (Varca) येथे काल रात्री त्रिनिदाद मार्टिन्स या 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा नेमका कुठल्या कारणासाठी खून करण्यात आला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, हा खून कदाचित जमीन व्यवहारातून झाला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. यासंबंधी पोलिस तपास चालू आहे. मात्र, प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी (police) याबाबत तूर्त तरी मौन पाळले आहे.

मार्टिन्स यांच्या डोक्यावर लोखंडी दांड्याने वार करून त्यांचा खून केला होता. रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला. ज्या तरेने खुन्याने घरातील कुठल्याही वस्तूला हात लावलेला नाही त्यावरून हा खून (murder) चोरीच्या उद्देशाने केलेला नसून त्यामागे दुसरेच कारण असावे असा तर्क पोलिस व्यक्त करत आहेत. मयत मार्टिन्स घरात एकटेच राहत असत. काल त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या बाजूने प्रतिसादच येत नव्हता.

त्यामुळे काहीतरी अघटित घडले असावे या संशयाने त्यांनी कोलवा पोलिसांना त्याची खबर दिली. पोलिसांनी त्याच्या घरी येऊन पाहिले असता, बाहेरचा दरवाजा त्यांना उघडलेला दिसला. आत मार्टिन्स यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांना दिसून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT