Varca Murder Case Dainik Gomantak
गोवा

वार्का खून प्रकरणाच्या तपासाला वेग, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

मार्टिन्स यांच्या घरी आलेल्यांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतला जाणार

आदित्य जोशी

मडगाव : वार्का येथील त्रिनिदाद मार्टिन्स हत्या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केलं आहे. ज्याठिकाणी मार्टिन्स यांचं घर आहे, त्याच भागातील ठिकठिकाणचं सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या फुटेजच्या माध्यमातून पोलीस आपला तपास पुढे नेणार असल्याची माहिती आहे. हत्येपूर्वी मार्टिन्स यांच्या घरी कोण आलं होतं याचा तपास फुटेजच्या माध्यमातून केला जाणार आहे. (Varca Murder Case News Updates)

वार्का येथील 80 वर्षीय वृद्धच्या खुनात हात असल्याच्या संशयातून कोलवा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा एका परप्रांतीय इसमालाही ताब्यात घेतले आहे. त्याला अजून अटक करण्यात आली नसली तरी खून झाला त्या दिवशी त्याचा त्या परिसरात वावर होता का, याचा तपास पोलिस करत आहेत.

घरात एकटेच राहणाऱ्या मार्टिन्स यांचा मागच्या आठवड्यात रात्रीच्या वेळी खून झाला होता. त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईपचा प्रहार करण्‍यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी (Police) मयताची मुलगी जुबेल (37) हिला अटक केली आहे. मालमत्तेच्या वादातून तिने आपल्या वडिलांचा खून (Murder) केल्याचा पोलिसांचा कयास आहे. मात्र जुबेलने हा खून अन्य कुणा दुसऱ्याकडून करून घेतला असावा अशीही पोलिसांना शंका आहे. त्यामुळेच त्या व्‍यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अटक करण्यात आलेल्या झुबेल हिला रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी तिला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्‍याची माहिती तपास अधिकारी मेल्सन कुलासो यांनी दिली आहे. या प्रकरणी जरी झुबेल हिला अटक (Arrest) केली असली तरी तिने अजून खुनाची कबुली दिलेली नाही.

मयत मार्टिन्स यांच्या डोक्यावर लोखंडी दांड्याचा वार करून त्‍यांचा खून करण्‍यात आला आहे. त्यांच्या तोंडावरही असंख्य वार करण्यात आले होते. ज्या प्रकारे हा हल्ला झालाय, त्‍याद्वारे हे काम एखाद्या पुरुषाने केल्याचा संशय पोलिसांना आहे. झुबेल हिने या अज्ञात आरोपीशी संगनमत करुन हा खून करवून घेतला असावा, असाही पोलिसांचा कयास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT