मोपा विमानतळामुळे शेती-बागायतीचे नुकसान

‘जीएमआर’ कंपनीविरोधात उगवेतील शेतकरी एकनाथ महाले यांची याचिका
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak

पेडणे : मोपा आंतरराष्ट्रीय हरित विमानतळ प्रकल्पाच्या कामात बांधकाम कंत्राटदार जीएमआर कंपनीने निष्काळजीपणा केल्याने या प्रकल्प परिसरातील शेतकरी - बागायतदार यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे. ‘जीएमआर’ने प्रकल्पाचे काम करताना योग्य ती काळजी न घेतल्याने आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याने आपली शेती तसेच बागायतीची अपरिमित हानी झाली आहे, अशी माहिती मधलावाडा - उगवे येथील शेतकरी एकनाथ सोमा महाले यांनी दिली. (Mopa Airport News Updates)

Mopa Airport
अखेर तिळारी कालव्यात सोडले ‘पाणी’

यासंदर्भात आपण पेडणे (Pernem) कनिष्ठ दिवाणी न्यायालयात जीएमआर कंपनीविरोधात नुकसान भरपाईसाठीचा दावा दाखल केला आहे. तसेच सदर बांधकामाला स्थगिती देण्याची विनंती केली आहे, अशी माहिती महाले यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, आपली गावात वडिलोपार्जित शेतजमीन आहे. आपल्या जागेतील शेती-बागायतीचे मोपा विमानतळ (Mopa Airport) कामामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आपण वडिलोपार्जीत शेतजमीन विकसित केली. त्यात 35 माड, 200 काजू, 15 आंबा, 10 लिंबू, 100 सुपारीच्या झाडांची योग्य पद्धतीने लागवड केली होती. ही लागवड विमानतळ प्रकल्पाचे बांधकाम करणाऱ्या जीएमआर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे धुळीस मिळाली आहे. यामुळे आपले श्रम आणि कष्ट तसेच त्यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. यातून सुमारे 20 लाखांचे नुकसान येथे झाले आहे.

जीएमआर कंपनीने विमानतळाचे बांधकाम करताना प्रकल्प सभोवतालचा परिसर आणि पठाराखालील गावांचा कोणताही विचार केला नाही. परिणामी विमानतळ प्रकल्प काम सुरू असताना धूळ प्रदूषण होते आणि पर्यावरणाची हानी होत आहे.

Mopa Airport
काणकोण पालिकेचे चावडीतील उद्यान खुले करण्याचे प्रयत्न

शेतात दगड, माती!

गेल्यावर्षी 15 मे रोजी या प्रकल्पातून पाण्याचा मोठा प्रवाह आमच्या तसेच आसपासच्या जमिनीमध्ये शिरला. त्या प्रवाहाबरोबर प्रकल्पातील गाळमिश्रित माती, दगड, धोंडे सर्व शेत बागायतीत पसरले आणि एका क्षणात सर्व बागायती त्यात नष्ट झाली. जमिनीवर सर्वत्र माती साचली, पंपहाऊसही त्यात गेले. विहीर, इलेक्ट्रिक पंप, कुंपण आदी तर त्यात गाडले गेले. त्यानंतर तर या जमिनीत काही लागवड करण्यासारखी स्थिती राहिली नाही.

कंत्राटदार कंपनी जबाबदार

कंत्राटदार कंपनीने सखल भागात काही धोका पोहचणार नाही यासाठी पुरेशी दक्षता घेतलेली नाही. सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) हनुमंत आरोस्कर विरुद्ध केंद्र सरकार या याचिकेच्या निवाड्यानुसारही विमानतळाचे काम होत नाही. या निवाड्यात पर्यावरण रक्षण आणि परिसराच्या सुरक्षिततेसंबंधाचे उपाय यासाठी काही बंधने घातली आहेत. आपल्याला शेती - बागायतीला कायमचे मुकावे लागले आहे. यामुळे आपण पेडणे न्यायालयात दाद मागितली आहे, अशी माहिती महाले यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com