Vante Sattari Fire  Dainik Gomantak
गोवा

Vante Sattari Fire: ..अन डोळ्यासमोर स्वप्नांची राख झाली! वांते-सत्तरीत आगीचे तांडव; पैसे, कागदपत्रे, सोनेही खाक Watch Video

Goa Fire News: भिरोंडा पंचायत क्षेत्रातील पिळ्येकरवाडा वांते, सत्तरी येथील अंजनी तिवरेकर (गावडे) यांच्या घराला शुक्रवारी सकाळी आग लागून मोठे नुकसान झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: भिरोंडा पंचायत क्षेत्रातील पिळ्येकरवाडा वांते, सत्तरी येथील अंजनी तिवरेकर (गावडे) यांच्या घराला शुक्रवारी सकाळी आग लागून मोठे नुकसान झाले. सुदैवाने, आगीची घटना घडली तेव्हा घरात कुणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली.

आगीत विजेवरील उपकरणे, रोख दीड लाखांची रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, सोन्याचे दागिनेही जळून खाक झाले. अंदाजे १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अंजनी तिवरेकर ह्या रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. सकाळी नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या होत्या. त्यांची मुलगी शाळेत गेली होती. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घरातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी तातडीने अंजनी यांना कळविले. त्या धावतच घराकडे पोहोचल्या, मात्र तोपर्यंत घरातील सर्वच साहित्य जळाले होते. काही वेळातच त्यांची मुलगी ही घटनास्थळी पोहोचली. या दोघींनी मिळून उर्वरित आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीत सर्व सामान खाक झाले होते.

घटनेची माहिती मिळल्यानंतर वाळपई पोलिस घटनास्थळी दाखल झाले व घरातील गॅस सिलिंडर सुरक्षित बाहेर काढला. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान सतीश के. नाईक, राहुल कवठणकर, अविनाश नार्वेकर , गंगाराम पवन घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाने अंदाजे ५ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळवले. वाळपई पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास वाळपई पोलिस उपनिरीक्षक सोहम मळीक यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

अजून कारण अस्पष्ट

आग कशी लागली याचे स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळेच आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घरावर पत्र्यांची छप्पर व बाजुला तुरटी असल्याने पेट अधिक वेगाने पसरला. अंजनी ह्या रोजंदारीवर काम करीत असल्याने त्यांनी एक एक पैसा जमा करुन ठेवला होता. तो असा अचानक आगीत खाक झाल्याने त्यांना प्रचंड धक्का बसला आहे. त्याना मदतीचा हात मिळावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Alphanso Mango Controversy: हापूस कोकणी की गुजराथी? वाद पेटला; 'वलसाड हापूस' GI मानांकनाची गुजरातची मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; मनोज माघार घेणार?

Goa Nightclub Fire: गोव्यातील क्लबमध्ये अग्नितांडव! PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

Omkar Elephant: ‘ओंकार’ तोरसे परिसरातच! आलटून-पालटून करतोय प्रवास; नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त Video

Goa Coastline: गोव्याची किनारपट्टी वाढली! नव्या मोजणीप्रमाणे 33 किमी जास्त; 193 किमी पट्टा निश्चित

SCROLL FOR NEXT