Sangli Fire News: लग्नघरात आगीचे तांडव! गोव्याच्या मायलेकीसह चौघांचा सांगलीत मृत्यू; मृतांत गरोदर महिलेचा समावेश

Goa Mother Daughter Death: दुकानाच्या वरील मजल्यावर राहण्यास असलेले जोशी कुटुंबिय आगीने भयभीत झाले. गोंधळून गेले. घरातून बाहेर जाण्यासाठी दुकानातूनच रस्ता असल्याने कुटुंबांना बाहेर पडता येईना.
Goa Death News
Tragic DeathDainik Gomantak
Published on
Updated on

विटा: येथील सावरकरनगरमध्ये भांड्याच्या दुकानाला आग लागून चौघांचा श्वास गुदमरून व भाजून मृत्यू झाला. यामध्ये गोव्याच्या प्रियंका योगेश इंगळे (वय २५) आणि सृष्टी योगेश इंगळे (वय २ वर्षे) या मडगाव येथील मायलेकीचा समावेश आहे. याशिवाय विष्णू पांडुरंग जोशी (वय ४४), सुनंदा विष्णू जोशी (वय ४०, दोघे सावरकरनगर, विटा) यांचा मृत्यू झाला. सुरज विष्णू जोशी (विटा) हे जखमी आहेत. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

येथील सावरकरनगरमध्ये जोशी यांचे तीन मजली आरसीसी घर आहे. खालच्या मजल्यात ‘श्री जय हनुमान स्टील अँड फर्निचर’ हे दुकान आहे. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर ते राहत होते. सकाळी अचानक दुकानाला आग लागली. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण केले.

Goa Death News
Buimpal Fire Incident: भुईपाल येथे मध्यरात्री आगीचे थैमान! घरातील साहित्य, पत्रे जळून खाक; 4 लाख रुपयांचे नुकसान

दुकानाच्या वरील मजल्यावर राहण्यास असलेले जोशी कुटुंबिय आगीने भयभीत झाले. गोंधळून गेले. घरातून बाहेर जाण्यासाठी आग लागलेल्या दुकानातूनच रस्ता असल्याने कुटुंबांना बाहेर पडता येईना. आगीने धुराचे लोट व आगीच्या ज्वालाने कुटुंबातील चौघांचा जीव गुदमरू लागला. दरम्यान, दुकानाच्या शटरमधून, कडेच्या फटीतून धुराचे लोट येत असल्याचे लोकांना दिसताच त्यांनी वरच्या मजल्यावरील जोशी कुटुंबांना हाका मारण्यास सुरुवात केली. त्यांच्यापर्यंत त्या पोहोचल्या नाहीत.

Goa Death News
Japan Airlines Fire Video: जपानमधील विमान दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू- Reports

भावाच्या लग्नासाठी आलेल्या बहिणीचा मृत्यू

विष्णू जोशी यांचा मुलगा मनिष याचे १६ नोव्हेंबर रोजी लग्न आहे. त्याची बहीण प्रियंका इंगळे गोव्याहून विटा येथे माहेरी आली होती. ती गरोदर होती. लग्नाच्या खरेदीनिमित्त रविवारी जोशी कुटुंब दिवसभर बाहेर होते. रात्री उशिरा ते विटा येथे घरी परत आले. सकाळी ते लवकर उठले नव्हते. मात्र अचानक लागलेल्या आगीत आई, वडील, बहिणी व तिच्या दोन वर्षाच्या मुलीसह तिचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com