Vande Bharat Express Dainik Gomantak
गोवा

Vande Bharat Express: 'वंदे भारत' एक्सप्रेस कोझिकोडपर्यंत हवी, खासदार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेत मागणी

Vande Bharat Kozhikode: गोव्‍यातील अनेक नागरिक व्‍यवसाय आणि पर्यटनानिमित्त केरळला जात असतात.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्‍यातील अनेक नागरिक व्‍यवसाय आणि पर्यटनानिमित्त केरळला जात असतात. त्‍यांच्‍या सोयीसाठी वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्‍वे सेवा केरळच्या कोझिकोडपर्यंत करण्‍यात यावी, अशी मागणी राज्‍यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी मंगळवारी राज्‍यसभेतील शून्‍य प्रहारावेळी बोलताना केली.

वंदे भारत सध्‍या मडगाव ते मंगळुरू या दरम्यान धावते. त्‍यामुळे विविध कारणांनी केरळला जाणाऱ्या गोमंतकीयांना मध्‍येच रेल्‍वे बदलावी लागते. त्‍यात त्‍यांचा वेळ वाया जातो. अनेकदा मंगळुरुतून रेल्‍वे बदलताना तिकीटे मिळत नसल्‍याने ज्‍येष्‍ठ नागरिक व पर्यटकांना त्रास सोसावा लागतो.

पर्यटकांना मोठा लाभ: गोवा आणि केरळ या राज्‍यांत आलेले देशी आणि विदेशी पर्यटक दोन्ही राज्यांत फिरण्‍याची योजना आखतात. अशांना ‘वंदे भारत सेवा’ मडगाव ते कोझिकोडपर्यंत दिल्‍यास त्‍याचा त्‍यांना लाभ होऊ शकतो. मंगळुरुत उतरून रेल्‍वे बदलावी लागणार नाही,असे तानावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू अखेर पोलिसांच्या ताब्यात! मोपा विमानतळावरून थेट वैद्यकीय तपासणीसाठी

SCROLL FOR NEXT