Valvanti River Dainik Gomantak
गोवा

Valvanti River: आमची नदी वाचवूया! 'वाळवंटी'च्या रक्षणासाठी तरुणाईचा पुढाकार; पर्यटकांच्या बेशिस्त वर्तनावर बंदीची मागणी

Valvanti River Cleanliness Drive: मोर्ले गावातून वाहणाऱ्या वाळवंटी नदीच्या संरक्षणासाठी स्थानिक युवकांनी पुढाकार घेतला असून रविवार २७ रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

पर्ये: सत्तरी तालुक्यातील मोर्ले गावातून वाहणाऱ्या वाळवंटी नदीच्या संरक्षणासाठी स्थानिक युवकांनी पुढाकार घेतला असून रविवार २७ रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उन्हाळ्यात या नदीतील ‘उभो गुणो’, ‘मधले तळप’ आणि ‘करकार’ या डोहांमध्ये आंघोळी करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, हे पर्यटक नदीकिनारी धांगडधिंगा करणे, जेवण बनवणे, मद्यपान करणे आणि प्लास्टिक व दारूच्या बाटल्यांचा कचरा फेकून परिसर विद्रूप करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालावी आणि नदीकाठ सुशोभित ठेवावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

स्थानिकांनी उपजिल्हाधिकारी तसेच मोर्ले व केरी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन सादर करून पर्यटकांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आता स्थानिक युवकांनीच पुढाकार घेत, बाहेरील पर्यटकांना येथे येऊ न देण्याचा इशारा दिला आहे. याचबरोबर नदीच्या रक्षणासाठी ‘आमची नदी वाचवूया’ या नावाने सोशल मीडियावर ग्रुप तयार करून जनजागृतीही सुरू करण्यात आली आहे.

जागृती अभियान

‘उभो गुणो’ आणि ‘करकार’ या ठिकाणी गेल्या काही दिवसांत नदीत बुडून दोन मृत्यूची प्रकरणे घडली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत आणि नदी परिसर सुरक्षित राहावा, यासाठी जागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून येत्या रविवारी, २७ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात ‘उभो गुणो’ ते ‘करकार कोंड’ पर्यंत नदी पात्राची स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT