Sal River: करोडो रुपये जातात कुठे? पोर्तुगीजकाळापासूनचे वैभव ते गटारगंगा; प्रदूषणामुळे साळ नदीची दुरवस्था

Sal River Pollution: साळ नदी ही सासष्टीतील जीवनदायिनी मानली जाते; पण आता या नदीची परिस्थिती फार खालावलेली आहे. स्वच्छता नाही, पाणी व परिसर प्रदूषित आहे.
Sal River Pollution
Sal River NewsDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: साळ नदी ही सासष्टीतील जीवनदायिनी मानली जाते; पण आता या नदीची परिस्थिती फार खालावलेली आहे. स्वच्छता नाही, पाणी व परिसर प्रदूषित आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारचे व लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून साळ नदीच्या स्वच्छता मोहिमेसाठी सरकारतर्फे करोडो रुपये खर्च केले जातात. मात्र, नदीतील स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे हा अवाढव्य खर्च नेमका कुठे केला जातो, हा प्रश्न लोकांना पडलेला आहे.

Sal River Pollution
Sal River: 'सासष्टी'ची जीवनदायिनी ते गटारगंगा! 'साळ' नदीची दुरवस्था रोखण्यास सरकार अपयशी

साळ परिसरातील एक व्यापारी व समाजकार्यकर्ते सुदेश मळकर्णेकर यांच्या म्हणण्यानुसार, पोर्तुगीज काळात या नदीतून लोक व्यापार करीत होते.

Sal River Pollution
Chamarkond Bridge: गोवा- महाराष्ट्राला जोडणाऱ्या पोर्तुगीजकालीन पुलाचे अस्तित्व धोक्यात? एका बाजूचा कठडा कोसळला

खारेबांध येथे व्यापाराची उतरण केली जात असे. शिवाय या नदीत वेगवेळ्या प्रकारचे मासे मिळत; पण आता या नदीचे वैभव कुठेतरी हरवल्यासारखे वाटते. या नदीचा अजूनही अनेक कामांसाठी उपयोग होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com