वाळपई, निरोगी राहण्यासाठी शारीरिक व्यायाम महत्त्वाचा आहे. त्यासाठी नियमित योग करून आपले आरोग्य सांभाळले पाहिजे.
आज बदलत्या जीवनशैलीमुळे व बाहेरच्या फास्टफूडमुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत, असे वाळपई आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास नाईक यांनी सांगितले.
राष्ट्रीय आयुष मिशन आयुष सेल, आरोग्य संचालनालय व वाळपई आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमानाने तालुका पातळीवर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयासाठी आयोजित योग स्पर्धेवेळी डॉ. नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. स्वाती, डॉ. राजश्री गावडे, डॉ. पियांशी नाईक, नताशा धुरी, डॉ. मृणात च्यारी आदींची उपस्थिती होती.
योग स्पर्धेत ७ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची मिळून ८० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. यात होंडा हायस्कूलने चॅम्पियन चषक पटकावले.
तसेच ११ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम-सीया गावकर (सरकारी प्राथमिक शाळा गुळेली), व्दितीय-अघन्या गावस (सरकारी प्राथमिक शाळा होंडा), तृतीय-वीहरिका नाईक (सरकारी प्राथमिक शाळा गुळेली). ११ वर्षाखालील मुलांचा गट प्रथम-कार्तिक शिंदे (सरकारी प्राथमिक शाळा होंडा), व्दीतीय-श्रीनिवास पाटील - सरकारी प्राथमिक शाळा होंडा, तृतीय-सदा गावकर, सरकारी प्राथमिक शाळा होंडा, १६ वर्षाखालील मुलींचा गट प्रथम-स्नेहा दास (सरकारी माध्यमिक विद्यालय होंडा),
व्दितीय-गौतमी ठाकूर (सरकारी माध्यमिक विद्यालय होंडा), तृतीय - पूर्वा गावडे (सरकारी माध्यमिक विद्यालय होंडा), १६ वर्षा खालील मुलांचा गट प्रथम-अंश शिरोडकर (सरकारी माध्यमिक विद्यालय होंडा), व्दितीय - नीलेश गावकर (सरकारी माध्यमिक विद्यालय होंडा), तृतीय - सोहम सावंत (सरकारी माध्यमिक विद्यालय होंडा). तसेच इतर बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. तसेच सहभागी सर्व मुलांनी प्रशस्तिपत्रे देण्यात आली.
स्वागत भिडे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल गावस यांनी केले. परिक्षण सिद्धी गुणाजी व सुषमा च्यारी यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.