South Goa: संविधानविरोधी वक्तव्य करणारे विरियातो निवडून येणे हे लोकशाहीचे अपयश - हिंदू जनजागृती समिती

Hindu Janajagruti Samiti Goa: असे लोक संसदेत जाऊ लागले, तर निश्चितच भविष्यात या संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो - रमेश शिंदे
Viriato Fernandes
Viriato FernandesDainik Gomantak
Published on
Updated on

Hindu Janajagruti Samiti Goa

‘गोव्यातील जनतेवर संविधान जबरदस्ती लादले गेले’, असे म्हणून गोमंतकाला मुक्त करण्यासाठी लढणार्‍या क्रांतीकारकांचा अपमान करणारे विरियातो फर्नांडिस हे खासदार म्हणून निवडून येणे हे एकप्रकारे भारतीय लोकशाहीचे अपयश म्हणावे लागेल, असे म्हणत देश हिंदू राष्ट्र होणे आवश्यक असल्याचे हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे.

'आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेनुसार निवडून येणारे जनतिनिधी हे संसदेत बसून देशातील जनतेच्या हितांचे रक्षण करणारे, तसेच जनतेला सुरक्षा देणारे कायदे बनवतात; मात्र ज्यांना भारताचे संविधान, सार्वभौमता आणि कायदेच मान्य नाहीत, असे लोक संसदेत जाऊ लागले, तर निश्चितच भविष्यात या संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो,' असे समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.

या लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानच्या आय.एस्.आय.शी संबंध असल्याचा आरोप असणारा खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंह आणि काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करण्याच्या आरोपावरून अटक असणारा ‘रशीद इंजिनियर’ यांच्यासारखे लोक देशविरोधी, तसेच फुटिरतावादी तुरुंगातून निवडून आले आहेत, असे शिंदे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Viriato Fernandes
बँड आणि ॲडव्होकेट गाऊनशिवाय कोर्टात हजेरी, महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिला कारवाईचे आदेश

फोंडा, गोवा येथे 12 वे ‘अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. 24 ते 30 जून 2024 या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा येथे हा महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सावाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रमेश शिंदे बोलत होते.

या महोत्सवासाठी भारतातील 26 राज्यांतील एक हाजारहून अधिक हिंदु संघटनांच्या दोन हजारहून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com