Vat Purnima 2024 Goa: भर पावसातही वटपूजनाचा उत्साह; सकाळपासून गर्दी

Vat Purnima 2024 Goa: डिचोलीत सुवासिनींकडून वडाची मनोभावे पूजा
Vat Purnima 2024 Goa:
Vat Purnima 2024 Goa: Dainik Gomantak

Vat Purnima 2024 Goa

डिचोली पतिव्रतेचे महात्म्य वर्णन करणारे आणि सुवासिनींच्या उत्साहाला उधाण देणारे वटपौर्णिमा व्रत आज (शुक्रवारी) डिचोली शहरासह गावोगावी उत्साहात साजरे करण्यात आले. सकाळी रिपरिपणाऱ्या पावसाची पर्वा न करता पारंपरिक वटवृक्षाची पूजा करण्यासाठी गावोगावी वटवृक्षाजवळ सकाळपासूनच सुवासिनींची गर्दी दिसून येत होती.

वटवृक्षाभोवती धागा गुंफत सात फेरे मारतानाच सुवासिनींनी मनातील इच्छा प्रकट करीत आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागितले. ‘जन्मोजन्मी हाच पती प्राप्त होवो’ हा वर मागायलाही सुवासिनी विसरल्या नाहीत. सकाळी नऊनंतर दुपारपर्यंत पावसाने उसंत घेतल्यामुळे सुवासिनींचा आनंदही द्विगुणित झाला. दुपारपर्यंत सर्वत्र वटपौर्णिमेची लगबग दिसून येत होती.

शुक्रवारी सकाळपासूनच डिचोली शहरासह मये, नार्वे, सर्वण, कारापूर, लाडफे, मेणकूरे, साळ, पिळगाव आदी गावोगावी वटपौर्णिमेचा उत्साह दिसून येत होता. नऊवारी लुगडं नेसून आणि साजशृंगार करून सुवासिनी पारंपरिक वडाच्या झाडाजवळ जमल्या होत्या. बहुतेक ठिकाणी सकाळपासूनच गर्दी दिसून येत होती.

गावोगावी सुवासिनींनी वटवृक्षाची पारंपरिक पद्धतीने पूजा आणि अन्य रितीरिवाज केले. मनोकामना व्यक्त करीत सुवासिनींनी वटवृक्षाभोवती धागा गुंफित सात फेरे मारले. प्रथमच व्रत धरलेल्या नवविवाहितांनी यजमानांसह ब्राम्हणांच्या साक्षीत वडाची पूजा केली. नंतर देवदेवतांना वाण अर्पण केल्यानंतर एकमेकांना वाण देऊन सुवासिनींनी वटपौर्णिमा व्रताचा आनंद द्विगुणित केला.

Vat Purnima 2024 Goa:
Bicholim Accident: जीपगाडीच्या धडकेत दोघेजण जखमी; व्हाळशी जंक्शनवर अपघात

फोटो, सेल्फी शेअर करण्यात व्यग्र

सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे असल्याने प्रत्येक सण, उत्सवावेळी सोशल मीडियाचा वापर वाढत आहे. वटपौर्णिमेचे व्रत साजरे करतानाच काही सुवासिनी मोबाईलवरून फोटो तसेच सेल्फी काढताना दिसून येत होत्या. फोटो आणि सेल्फी समाज माध्यमावरून एकमेकांना शेअर करण्यातही काही सुवासिनी व्यग्र असल्याचे दिसून येत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com