Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : वेळुस येथील पाषाणी मूर्ती चोरीला जाण्याची भीती; ग्रामस्थांना चिंता

Valpoi News : अनेक पर्यावरणप्रेमी किंवा अभ्यासक या भागाला भेट देतात. मात्र, चार दिवसांपूर्वी काहीजणांनी वेळुस येथे पाषाणी मूर्तींची पाहणी करून या मूर्ती आम्ही अभ्यासासाठी घेऊन जातो, असे सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई, सत्तरी तालुक्याला देवीदेवतांचे वैभव लाभले आहे. वेळुस येथील प्रसिद्ध श्री रवळनाथ देवस्थान परिसरात पुरातन काळातील अनेक पाषाणी मूर्ती आहेत.

त्यात गजलक्ष्मी, श्री सातेरी केळबाई, घोडेश्वर, गणपती, नंदी शिवलिंग तसेच इतर मूर्तींचा समावेश आहे. या मूर्ती अभ्यासासाठी नेण्याची विचारणा काहीजणांनी केली. त्यामुळे येथील मूर्ती चोरीला जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अनेक पर्यावरणप्रेमी किंवा अभ्यासक या भागाला भेट देतात. मात्र, चार दिवसांपूर्वी काहीजणांनी वेळुस येथे पाषाणी मूर्तींची पाहणी करून या मूर्ती आम्ही अभ्यासासाठी घेऊन जातो, असे सांगितले.

याची खबर ग्रामस्थ व गावकरी मंडळींना लागताच त्यांनी याला विरोध दर्शविला. त्यामुळे या मूर्तींना सुरक्षा गरजेची असून आज सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी श्री रवळनाथ देवस्थानचे पुजारी कृष्णा गावकर म्हणाले की, चार दिवसांपूर्वी काहीजणांनी या परिसराला भेट घेऊन पाषाणी मूर्तींची पाहणी केली आणि ‘आम्ही या मूर्ती अभ्यासासाठी घेऊन जातो’ असे सांगितले. यावेळी आम्ही तेथे उपस्थित नव्हतो. मात्र, त्यावेळी आम्हाला खूप भीती वाटली.

या मूर्ती आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली देणगी आहे. हे वैभव टिकवून ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. या मूर्तींचे जतन व संवर्धनासाठी गावकर मंडळी पुढाकार घेणार असून या मूर्ती कोणालाही घेऊन जाऊ देणार नाही, असे सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने गावकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

यापूर्वीही नेल्या होत्या मूर्ती

यावेळी रवळनाथ देवस्थानचे अध्यक्ष राजाराम गावकर म्हणाले, वेळुस येथे अनेक ठिकाणी पाषाणी मूर्ती आहेत. काही वर्षांपूर्वी पुरातन खात्यातर्फे अभ्यासासाठी म्हणून काही मूर्ती नेल्या होत्या, त्या अद्याप परत दिलेल्या नाहीत.

आता पुन्हा जर या मूर्ती नेल्या तर आम्ही काय करायचे? आम्ही या मूर्ती कोणालाही नेऊ देणार नाही. सरकारने याबाबत त्वरित उपाययोजना करून मूर्तींना सुरक्षा पुरवावी आणि गावचे वैभव टिकवून ठेवावे.

अधिकाऱ्यांनी केली पाहणी

यावेळी गावकर मंडळाशी सविस्तर चर्चा केल्यानंतर उपजिल्हाधिकारी धायगोडकर यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच सत्तरीचे मामलेदार, वाळपई पोलिस स्थानकातही निवेदन देण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सत्तरीचे संयुक्त मामलेदार सुरेंद्र गावकर यांनी वेळुस येथील श्री रवळनाथ मंदिर व सातोडे मार्गावरील पाषाणी मूर्तींची पाहणी केली. या मूर्तींना कोणी काही करणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT