Science Class  Gomantak Digital Team
गोवा

Valpoi News : ‘वाळपई नवोदय’ला मिळणार विज्ञान वर्ग

प्रारंभी 40 विद्यार्थ्यांना प्रवेश : 58 पालकांच्या न्याय्य लढ्याला तब्बल 34 वर्षांनी यश

गोमन्तक डिजिटल टीम

पद्माकर केळकर

वाळपई येथील उत्तर गोवा विभागाचे केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता अकरावी, बारावीसाठी विज्ञान शाखा नाही. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना काणकोण येथील नवोदय विद्यालयात अकरावी विज्ञान शाखेसाठी प्रवेश घ्यावा लागत होता. त्यावरून पालक संघटनेच्या इयत्ता दहावीच्या 58 पालकांनी मिळून पालक सुबोध देसाई व राजेंद्र गावस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात एक जनहित याचिका दाखल केली होती.

त्याला यश मिळाले असून यावर्षी जुलै पासून 11 वी विज्ञान वर्ग सुरू होणार आहेत. तब्बल 34 वर्षांनी पहिल्यांदाच विज्ञान वर्ग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर नवोदय समितीच्या पुणे विभागाने दखल घेत वर्ग सुरू होण्यासाठी हालचाली वेगवान केल्या होत्या. त्याची कामे प्रगतिपथावर असून विज्ञानवर्गासाठी लागणारी साधन सामुग्री विद्यालयात पोहचली आहे.

प्रयोगशाळा तसेच वर्ग इत्यादी गोष्टी शेवटच्या टप्प्यात आहेत. वाळपई नवोदय विद्यालयात विज्ञान शाखा अकरावी, बारावीसाठी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीस अनुसरून पालकांनी काही महिन्यांपूर्वी जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील ॲड. शशिकांत जोशी यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने कामकाज हाताळले आहे.

न्यायालयीन लढ्यामुळे यश मिळाले असून अँड. शशिकांत जोशींनी दिलेल्या समर्पित भावनेच्या सेवेमुळे सत्तरीतील विद्यालयात नवे बळ मिळाले आहे. आता केवळ विद्यालयाच्या जमीन मालकीचा विषय पूर्णत्वास येण्याची गरज आहे. त्यासाठीही न्यायालयीन लढाई सुरु आहे, असे सुबोध देसाई म्हणाले.

इतर विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश !

पालक संघटनेचे प्रमुख याचिकादार सुबोध देसाई म्हणाले,की वाळपई नवोदय विद्यालयात उत्तर गोव्यातून विविध भागातून विद्यार्थी पाचवीत प्रवेश घेतात. परंतु दहावी नंतर जर विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर मग काणकोण येथील नवोदय विद्यालयात धाव घ्यावी लागत होती. पण आता विज्ञान वर्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. यावर्षी सुरवातीला 40 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. त्यात प्रथम प्राधान्य नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना असणार आहे. व अन्य बाहेरील विद्यार्थ्यांना देखील प्रवेश दिला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

SCROLL FOR NEXT