Goa C-20 Conference : अध्यात्‍माने समस्‍या निराकारण शक्‍य

डॉ. शशी बाला : महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालयातर्फे उद्या वास्कोत ‘सी-20’ परिषद
Goa C-20
Goa C-20 Gomantak Digital Team

Goa C-20 Conference : आंतरराष्ट्रीय ‘जी-20’अंतर्गत येत्या शनिवार दि. 27 मे रोजी दाबोळी-वास्को येथे गोवा सरकार, महर्षी अध्यात्म विश्‍‍वविद्यालय, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज आणि भारतीय विद्या भवन नवी दिल्ली या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘सी-20’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

गोव्यात प्रथमच आयोजित ‘सी-२०’ परिषद ही ‘विविधता, सर्वसमावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावर होणार आहे. आध्यात्मिक मार्गाने विश्‍वातील समस्यांचे निराकारण शक्य असल्याचे मत नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजच्या अध्यक्ष प्रा. डॉ. शशी बाला यांनी व्यक्त केले.

Goa C-20
Goa ST Community Reservation:...अन्यथा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करू; मेळाव्यातून एसटी नेत्यांचा इशारा

या परिषदेनिमित्त पणजीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन समन्वयक श्‍‍वेता क्लार्क आणि डॉ. अमृता देशमाने या उपस्थित होत्या. दाबोळी येथील राजहंस नौदल सभागृहात सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत परिषद होणार आहे. तिचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे करतील. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे उपस्थित राहणार आहेत.

परिषदेत आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, उद्योग, पारंपरिक कला, पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील देश-विदेशातील नामांकित वक्ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती क्लार्क यांनी दिली.

Goa C-20
Goa Traffic Rule: भावांनो... एक जूनपासून वेगावर मर्यादा ठेवा!

अध्यात्म ही भारताची मोठी शक्ती

जगातील अनेक देश भारतापेक्षा अधिक संपन्न, तसेच संपत्ती, शस्त्रास्त्रे आणि विकास यात खूप पुढे आहेत. पण भारत हा अध्यात्म क्षेत्रातील गुरु आहे. अध्यात्म ही भारताची मोठी शक्ती आहे. जगभरात ज्या काही समस्या आहेत, त्याचे उत्तर अध्यात्मातून मिळू शकते, या दृष्टीनेच आंतरराष्ट्रीय ‘जी-20’अंतर्गत असलेली ‘सी-20’च्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. बाला यांनी दिली.

Goa C-20
Wildlife In Goa: जंगल, वन्यजीव संपदा वाचवण्यासाठी प्रयत्न हवेत- पर्यावरण अभ्यासक

आर्थिक संकट आणि हवामान बदल, दहशतवाद, महामारी यासारख्या जागतिक समस्यांविरोधात लढण्यासाठी तसेच युद्ध आणि दहशतवाद थांबवणे या उद्देशाने ‘जी-२०’ची निर्मिती झाली. ‘सी-20’ हा त्याचाच एक भाग आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com