Bicholim: डिचोलीत चोरट्यांकडून पुन्हा एकदा शाळा 'टार्गेट', एका खासगी माध्यमिक शाळेत चोरी

Bicholim School Theft: चोरट्यांनी पुन्हा एकदा शाळांना ‘टार्गेट’ केले असून डिचोली शहरातील एक खासगी माध्यमिक विद्यालय फोडण्याची घटना घडली आहे.
Bicholim
BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: चोरट्यांनी पुन्हा एकदा शाळांना ‘टार्गेट’ केले असून डिचोली शहरातील एक खासगी माध्यमिक विद्यालय फोडण्याची घटना घडली आहे. चोरीची ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा अंदाज आहे.

चोरट्यांनी किती ऐवज पळवला, त्याबद्दल नेमकी माहिती मिळालेली नाही. मात्र, चोरट्यांनी शाळेतील सीसी टीव्ही कॅमेरे बागवल्याचे आढळून आले आहे, तर चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली हत्यारे संबंधित शाळेतच टाकून पळ काढल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शाळेकडे संपर्क साधला असता, शाळेत झालेल्या चोरीसंबंधी माहिती देण्याचे टाळण्यात आले.

Bicholim
Goa Politics: सावंतांबद्दल काही बरळाल तर खबरदार! केतन भाटीकरांना इशारा; फोंड्यातील भाजप नेते आक्रमक

गुरुवारी सकाळी संबंधित विद्यालयात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी तळमजल्यावरील मुख्याध्यापिकेच्या केबिनसह कार्यालय तसेच वरच्या मजल्यावरील स्टाफ रूममधील कपाटे फोडून आतील दस्ताऐवज आणि अन्य सामान्य अस्ताव्यस्त टाकले होते.

शाळा इमारतीच्या मागच्या बाजूने असलेल्या झाडावरून चोरटे वरच्या मजल्यावर उतरून आत घुसले असावेत असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com