Goa Shigmotsav 2025 Dainik Gomantak
गोवा

Valpoi Shigmotsav 2025: वाळपईतील शिमगोत्सव 27 रोजी! लोकनाट्य स्पर्धा, शोभायात्रेचे आयोजन

Goa Shigmotsav 2025: गोवा पर्यटन खाते, पर्यटन महामंडळ व सत्तरी शिमगोत्सव समिती आयोजित शिमगोत्सव २७ रोजी वाळपईत साजरा करण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

वाळपई: गोवा पर्यटन खाते, पर्यटन महामंडळ व सत्तरी शिमगोत्सव समिती आयोजित शिमगोत्सव २७ रोजी वाळपईत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त भरघोस बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी चित्ररथ स्पर्धा, रोमटामेळ स्पर्धा लोकनृत्य स्पर्धा व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यासंदर्भात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा जाहीर करण्यात आली. यंदा प्रथमच सत्तरी तालुका पातळीवर लोककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा गुढीपाडव्याच्या दिवशी ३० मार्च रोजी वाळपई येथील नगरपालिकेच्या जुन्या व्यासपीठावर आयोजित करण्यात आले आहे.

सावंत म्हणाले, २७ रोजी संध्याकाळी ६ वाजता आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, समितीच्या कार्याध्यक्ष व आमदार डॉ. दिव्या राणे, उपाध्यक्ष नरहरी हळदणकर, विनोद शिंदे, सगुण वाडकर, राजश्री काळे, देवयानी गावस, प्रसाद खाडीलकर, उदय सावंत, उदयसिंग राणे, नगरसेवक, सरपंच, पंच व समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हातवाडा जंक्शन या ठिकाणी श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात येणार आहे. ४ वाजता मासोर्डे येथील रवळनाथ शांतादुर्गा व त्यानंतर वाळपई येथील श्री हनुमान मंदिरामध्ये श्रीफळ ठेवून प्रारंभ करण्यात येणार आहे.

यावेळी राज्य पातळीवर लोकनाट्य स्पर्धेचे आयोजन वाळपई येथील सुपर मार्केट आणि नगरपालिकेच्या व्यासपीठावरील खुल्या जागेत करण्यात आले आहे. रोमटमेळ, चित्ररथ, लोकनृत्य, वेशभूषा स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. रविवारपासून शिमगोत्सव कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेशिका वितरित करणे आणि स्वीकारण्यात येणार आहेत, असे समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

सहा वाजता शोभायात्रा

२७ रोजी ६ वा. शोभायात्रा निघणार असून चित्ररथ रोमटामेळ, वेशभूषा व लोकनृत्य स्पर्धेच्या शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. वाळपई येथील कोर्टाकडून प्रारंभ होईल. यामध्ये समितीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक सहभागी होणार असून पारंपरिक ढोल ताशांच्या वादनात याचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT