
डिचोली: डिचोलीत उद्या (गुरुवारी) शासकीय पातळीवरील शिमगोत्सव साजरा करण्यात येणार असून, शहरात ढोल-ताशांचा ‘घुमचे कटर घूम’ आवाज दुमदुमणार आहे. शिमगोत्सव साजरा करण्यासाठी डिचोली नगरीसह आयोजन समिती सज्ज झाली आहे.
दरम्यान, शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) डिचोलीचे ग्रामदैवत श्री शांतादुर्गा देवीसह विविध देवदेवतांना श्रीफळ अर्पण करण्यात आले. आयोजन समितीचे अध्यक्ष आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, मुख्याधिकारी तळवणेकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी श्रीफळ अर्पण करून देवदेवतांचे आशीर्वाद घेतले.
शिमगोत्सवानिमित्त चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य आणि वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. सायं. ४.३० वा. बोर्डे येथील श्री वडेश्वर देवस्थानकडून शिमगोत्सव मिरवणुकीला प्रारंभ होणार असून, भायली पेठमार्गे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मिरवणुकीची सांगता होणार आहे.
मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या पथकांनी उद्या (गुरुवारी) सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत हजर राहणे बंधनकारक आहे. सहभागी होणाऱ्या पथकांनी वेळेत उपस्थित राहून शिगमोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
चित्ररथ स्पर्धा : पहिले- रोख ८० हजार रुपये, दुसरे- ४५ हजार रुपये, तिसरे- ३५ हजार रुपये, चौथे- २५ हजार रुपये, पाचवे- २० हजार रुपये आणि प्रत्येकी ५ हजार अशी २० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
रोमटामेळ स्पर्धा : पहिले- रोख ४५ हजार रुपये, दुसरे- ३० हजार रुपये, तिसरे- २५ हजार रुपये, चौथे- १० हजार रुपये, पाचवे- ९ हजार रुपये आणि प्रत्येकी ५ हजार अशी ६ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
लोकनृत्य स्पर्धा : पहिले- रोख १७ हजार रुपये, दुसरे- १२ हजार ५०० रुपये, तिसरे- १० हजार रुपये, चौथे- ८ हजार रुपये, पाचवे- ५ हजार रुपये आणि प्रत्येकी ४ हजार अशी १० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
याशिवाय राज्य पातळीवरील लहान व मोठा गट तसेच डिचोली मर्यादित लहान व मोठा गट वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.