Valpoi Ponda Mango tree fell Blocking Traffic Dainik Gomantak
गोवा

Valpoi-Ponda : आंब्याचे झाड कोसळून वाहतूक ठप्प

कणकिरेतील घटना : अग्निशमन दलाने केला रस्ता मोकळा

गोमन्तक डिजिटल टीम

गुळेली : कणकिरे गुळेली येथे वाळपई - फोंडा मार्गावर आंब्याचे झाड कोसळल्यामुळे या भागातील वाहतूक सुमारे दिड तास ठप्प झाली. वाळपई व फोंडा येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन झाड हटवून वाहतूक खुली केली.

या विषयी सविस्तर माहिती अशी की, कणकिरे येथील म्होवकण या ठिकाणी वाळपई फोंडा मार्गालगत असलेल्या आंब्याच्या झाडाचा एक भाग आज सकाळी ७.४५ च्या दरम्यान मधोमध रस्त्यावर कोसळला.

या कोसळलेल्या झाडामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला. दुचाकी किंवा पादचाऱ्यांना चालूनसुद्धा जाता येत नसल्याने दोन्ही बाजूंनी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान, या ठिकाणी असलेल्या फडते यांच्या घराजवळून काहींनी दुचाकी व चारचाकीसाठी रस्ता काढला.

झाडे कापण्याची मागणी

वाळपई - फोंडा मार्गावर अनेक ठिकाणी अशाप्रकारची धोकादायक झाडे आहेत. ती झाडे या ठिकाणाहून हटवावी किंवा त्या झाडांच्या किमान मोठमोठ्या फांद्या छाटाव्या, अशी मागणी या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तसेच नागरिकांनी केली आहे. आता वारा पाऊस नसताना चांगले उभे असलेले झाड अशाप्रकारे कोसळल्यामुळे संबंधित यंत्रणेने इतर झाडाबद्दल विचार करावा, अशी मागणी होत आहे.

अनर्थ टळला

सकाळची वेळ असल्याने फोंडा, मडगाव, पणजी, बांबोळीकडे जाणाऱ्या लोकांमुळे हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो, पण झाड कोसळले तेव्हा सुदैवाने रस्त्यावर कोणी नव्हते. या भागातून प्रवास करणाऱ्या खासगी बसगाड्या, कदंब, कामगारांना ने आण करणाऱ्या खासगी कंपन्यांच्या बसगाड्या, ट्रक, कामावर जाणारे लोक, विद्यार्थी झाड पडल्याने अडकून पडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT