Ponda News: कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याची आवश्यकता - कृषीमंत्री रवी नाईक

फोंड्यात आज मंगळवारी साहित्यिक लेखक व कलाकार मिलिंद म्हाडगूत यांचा सत्तरीनिमित्त वाढददिवस व सत्कार सोहळा साजरा करण्यात आला
Ponda News
Ponda NewsDainik Gomantak
Published on
Updated on

कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याची आज आवश्यकता असून मिलिंद म्हाडगूत सारख्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांनी केले. फोंड्यात आज मंगळवारी साहित्यिक लेखक व कलाकार मिलिंद म्हाडगूत यांचा सत्तरीनिमित्त वाढददिवस व सत्कार सोहळा साजरा करण्यात आला त्यावेळी रवी नाईक बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर दैनिक गोमन्तकचे संपादक राजू नायक, फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच मिलिंद म्हाडगूत त्यांच्या पत्नी विद्या म्हाडगूत व सत्कार समितीचे अध्यक्ष महादेव खानोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रवी नाईक म्हणाले, 'युवकांनी मरगळ झटकून पुढे येण्याची आवश्यकता आहे. आजच्या समाजाला जर दिशा दाखवायचे काम करायचे असेल तर शिक्षक पत्रकारांनी पुढे यायला हवे. मिलिंद म्हाडगूत यांनी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे आणि त्यांच्या या कार्यात मित्रपरिवाराचे व पत्नीचे मोठे योगदान असून पुढील काळातही ते मिळेल अशी आशा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

Ponda News
पैशांच्या बदल्यात नाणी, सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष; पर्वरीत गुंतवणूकदारांची 5.80 कोटींची फसवणूक

संपादक राजू नायक म्हणाले, 'समाजाला योग्य दिशा दाखवण्या बरोबरच सुसंस्कृत युवा पिढी घडवण्याचे कार्य हे शिक्षकांकडून व्हायला हवे. पण दुर्दैवाने अवघ्याच लोकांकडून हे काम होताना दिसत नाही. समाजातील जाणिवा आणि उणिवा या प्रकर्षाने समोर आणताना एक सक्षम समाज घडायला हवा. मिलिंद म्हाडगूत हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व.'

'चित्रपटांबद्दल पुरेपूर माहिती असलेलं एक अजब रसायन म्हणजे मिलिंद म्हाडगूत असून पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरताना राजकारणाचा योग्य मागोवा त्यांनी घेतला आहे. मिलिंद आज पुण्या मुंबईत असते तर निश्चितच ते एखाद्या बड्या माध्यम समूहाचे बडे अधिकारी झाले असे सांगून त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.'

नगराध्यक्ष रितेश नाईक यांनीही मिलिंद म्हाडगूत यांना शुभेच्छा देताना सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले.

स्वागत व प्रास्ताविक महादेव खानोलकर यांनी केले. वाढदिवस सोहळा साजरा करताना कुवाडे या मिलिंद म्हाडगूत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे रवी नाईक व राजू नायक यांच्या हस्ते प्रकाशन झाले. मिलिंद म्हाडगूत यांनी मनोगतात आपल्या सर्व मित्र परिवाराला श्रेय दिले. रवी नाईक यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन तर राजू नायक यांच्या हस्ते मानपत्र देऊन म्हाडगूत यांचा सत्कार करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com