police taking bribe Goa Dainik Gomantak
गोवा

'कुंपणंच खातंय शेत', केस मिटवण्यासाठी पोलिसाने घेतली लाच; वाळपईत हेड कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई

Valpoi Police Suspended: एका तक्रारदाराकडून पैसे मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे

Akshata Chhatre

वाळपई: वाळपई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल रुपेश मळीक यांना गैरवर्तणुकीच्या आरोपावरून तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. एका तक्रारदाराकडून पैसे मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या गुन्ह्याची केस मिटवण्यासाठी मळीक यांनी पैशांची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षकांनी रविवारी (दि.१४) वायरलेस मेसेजद्वारे मळीक यांच्या निलंबनाची घोषणा केली. १४ सप्टेंबरपासून हे निलंबन लागू झाले असून, याबाबतचा अधिकृत आदेश लवकरच जारी केला जाईल. या वायरलेस मेसेजमध्ये निलंबनाचे नेमके कारण नमूद केलेले नाही, मात्र पैशांची मागणी केल्याच्या आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

होंडा-सत्तरी येथे पंच दीपक गावकर यांना दोन परप्रांतीय व्यक्तींनी मारहाण केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयितांना अटक केली. मात्र, त्यांना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाला. या मारहाणीच्या वेळी गावकर यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी तुटून तिचा अर्धा भाग हरवला होता.

पोलिसांनी संशयितांकडून तुटलेली साखळी मिळवून दिल्यानंतर, हेड कॉन्स्टेबल रुपेश मळीक यांनी गावकर यांच्याकडे, "सोनसाखळी मिळाली, केस मिटली, आता आम्हाला पैसे द्या" अशी मागणी केली. त्यानंतर गावकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली.

गेल्या पाच वर्षांत गोवा पोलीस दलातील २०० हून अधिक कर्मचाऱ्यांवर विविध गुन्ह्यांमध्ये, विशेषतः भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांवरील गैरवर्तणुकीच्या वाढत्या तक्रारींमुळे विभागाची प्रतिमा खराब होत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील शिस्त आणि पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील काळात या प्रकरणाची अधिक चौकशी होऊन सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नव्वदमध्ये गोव्यातील गुन्हेगार रवींच्या नावाने थरथर कापत होते; महाराष्ट्रापर्यंत पोहोचला होता दबदबा

अग्रलेख: दरोडेखोरांना गोव्‍यात साह्य कुणी केले?

Goa Today's News Live: गोव्यात एक दिवसाची शासकीय सुट्टी; तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर

Asia Cup: भारतीय संघाने दवडली संधी! पात्रता लढतीत सिंगापूरची मुसंडी; युईयाँगचे शानदार प्रदर्शन

Horoscope: 'या' 3 राशींसाठी आजचा दिवस खास! मोठी बातमी मिळणार; आर्थिक घडी बसणार

SCROLL FOR NEXT