इंदूरमध्ये दूषित पाणी प्यायल्यामुळे 15 जणांचा मृत्यू! तुम्ही पित असलेलं पाणी खरचं शुद्ध आहे का? 'असं' तपासा घरच्या घरी

Indore contaminated water death: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दूषित पाणी प्यायल्यामुळे १५ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
Health Safety Tips
Health Safety TipsDainik Gomantak
Published on
Updated on

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दूषित पाणी प्यायल्यामुळे १५ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक जण अद्याप गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत होता, जो रहिवाशांनी अजाणतेपणे प्राशन केला आणि ही मोठी दुर्घटना घडली. या घटनेने पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

पाणी तपासणीसाठी घरगुती किट्सचा वापर

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्या घरापर्यंत पोहोचणारे पाणी नेहमीच शुद्ध असेल असे नाही. त्यामुळे 'वॉटर टेस्टिंग किट्स'चा वापर करणे आता अनिवार्य झाले आहे. हे किट्स केवळ पाण्यात लपलेले घातक जंतूच दाखवत नाहीत, तर भविष्यातील गंभीर आजार टाळण्यासही मदत करतात. अचूक निदानासाठी या किट्सचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

Health Safety Tips
Goa Crime: कार अडवून केली मारहाण, शिवीगाळ! बड्डेत धारदार शस्त्रे घेऊन रस्त्यावर दंगा; 5 संशयित ठरले दोषी

कोणत्या चाचण्या आहेत सर्वात प्रभावी?

  • कोलिफॉर्म आणि ई-कोलाय किट: सांडपाण्यातील बॅक्टेरिया पाण्यात मिसळले आहेत का, हे तपासण्यासाठी हे किट ९० टक्क्यांपर्यंत अचूक निकाल देते. १८ ते २४ तासांत पाण्याचा रंग बदलल्यास त्यातील दूषितता स्पष्ट होते.

  • क्लोरिन टेस्टिंग किट: महापालिका सहसा जंतू मारण्यासाठी पाण्यात क्लोरिन मिसळते. या किटद्वारे पाण्यात क्लोरिनचे प्रमाण योग्य आहे की नाही हे तपासता येते. जर क्लोरिन नसेल, तर पाणी असुरक्षित मानले जाते.

  • टर्बिडिटी (गढूळपणा) टेस्ट: पावसाळ्यामुळे किंवा पाईपलाईन गळतीमुळे पाणी गढूळ झाले असल्यास या ट्युबद्वारे तातडीने तपासणी करता येते.

Health Safety Tips
Goa Winter: राज्यात पुढील 4 दिवस थंडीचे! वेधशाळेचा इशारा; दाबोळीत 17.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

टीडीएस (TDS) मीटर म्हणजे काय?

पाण्यातील विरघळलेली खनिजे आणि क्षारांचे प्रमाण मोजण्यासाठी 'टीडीएस मीटर' वापरले जाते. आरोग्य मानकांनुसार, ३०० mg/L पेक्षा कमी टीडीएस असलेले पाणी अत्यंत शुद्ध मानले जाते. ३०० ते ६०० mg/L दरम्यानचे पाणी पिण्यायोग्य असते, मात्र ६०० mg/L पेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी नियमित पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

घरच्या घरी कशी कराल चाचणी?

पाणी तपासण्यासाठी प्रथम एका स्वच्छ भांड्यात पाण्याचा नमुना घ्या. कोलिफॉर्म किटमध्ये रिअजेंट टाकून २४ तास बाजूला ठेवा. टर्बिडिटी ट्युबच्या तळाशी असलेले चिन्ह जर अस्पष्ट दिसत असेल, तर पाणी दूषित असल्याचे समजावे. इंदूरमधील दुर्घटनेची चौकशी सुरू असतानाच, तज्ज्ञांनी देशभरातील नागरिकांना आपल्या पिण्याच्या पाण्याची स्वतःहून चाचणी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून अशा आपत्ती टाळता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com