Goa Theft: पर्वरी सोनसाखळी चोरी प्रकरणाचा छडा, गोवा पोलिसांनी स्नॅचरला थेट उत्तराखंडमधून उचलले

Porvorim Chain Snatching: या प्रकरणी पोलिसांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अब्दुल रहमानला अटक केली, त्याला म्हापसा न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
Goa chain snatching case
Goa chain snatching caseDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim Gold Chain Snatching Case: ख्रिसमसच्या दिवशी पर्वरी येथील पीडीए कॉलनीमध्ये एका किराणा दुकानात झालेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा साळगाव पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अब्दुल रहमान (३२) याला अटक केली असून, त्याला म्हापसा न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकी घटना काय?

२५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास, तक्रारदार मेधा आग्शिकर यांच्या पर्वरी येथील 'मेधा निवास'मधील किराणा दुकानात दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आल्या होत्या. थंड पेय घेण्याच्या बहाण्याने या आरोपींनी मेधा यांच्या गळ्यातील तीन लॉकेट असलेली सोन्याची साखळी जोरात ओरबाडली आणि दुचाकीवरून फरार झाले. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०४(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उत्तराखंडमध्ये पोलिसांची 'हेक्टिक' मोहीम

तपासादरम्यान तांत्रिक मदतीने आरोपीची ओळख अब्दुल रहमान (रा. हरिद्वार, उत्तराखंड) अशी पटली. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली साळगाव पोलीस उपनिरीक्षक (PSI) अक्षय फातर्पेकर आणि त्यांच्या पथकाने थेट उत्तराखंड गाठले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि अथक परिश्रमानंतर आरोपीला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. ३१ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता त्याला अटक करण्यात आली आणि ट्रान्झिट रिमांडद्वारे गोव्यात आणले गेले.

Goa chain snatching case
Goa Crime: कार अडवून केली मारहाण, शिवीगाळ! बड्डेत धारदार शस्त्रे घेऊन रस्त्यावर दंगा; 5 संशयित ठरले दोषी

संयुक्त तपास पथकाचे यश

या कामगिरीमध्ये साळगाव आणि पर्वरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा होता. पोलीस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या देखरेखीखाली पीएसआय अक्षय फातर्पेकर, पीएसआय सिताराम मलिक, पीएसआय मंदार परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली. आज (दि.०३) रोजी आरोपीला म्हापसा कोर्टासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

पुढील तपास सुरू

पोलीस आता या गुन्ह्यातील दुसरा आरोपी आणि चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेत आहेत. परराज्यातील गुन्हेगारांनी गोव्याला लक्ष केल्याचे पुन्हा एकदा समोर आल्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com