

Drone ban in Goa: भारताचे संरक्षण मंत्री ४ आणि ५ जानेवारी २०२६ रोजी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एॅग्ना क्लेटस (Egna Cletus IAS) यांनी वास्को आणि आसपासच्या परिसरात ड्रोन, मानवरहित हवाई वाहने (UAVs) आणि एरिअल फोटोग्राफीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
हा आदेश ४ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजेपासून लागू होईल आणि ५ जानेवारी रोजी दुपारी १:०० वाजेपर्यंत अंमलात राहील. आयएनएस हंसा (INS Hansa) या नौदल तळाच्या दोन किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये हा निर्बंध लागू असेल. या काळात ड्रोनद्वारे कोणतेही छायाचित्रण किंवा चित्रीकरण करण्यास सक्त मनाई आहे.
संरक्षण मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी खालील ठिकाणे अत्यंत संवेदनशील मानली गेली असून, तिथे ड्रोन उडवणे कायदेशीर गुन्हा ठरेल:
दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Dabolim Airport)
आयएनएस हंसा मेस (INS Hansa Mess)
गोवा शिपयार्ड लिमिटेड (Goa Shipyard Limited)
NH 366: कुठ्ठाळी ते स्वतंत्रपथ, वास्को हा मार्ग
NH 566: बिर्ला क्रॉस ते वरुणापुरी हा मार्ग
संरक्षण मंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असून, यामध्ये नौदलाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी हवाई सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलीस आणि नौदल तळाच्या सल्ल्याने हे निर्बंध लादले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.