Valpoi Waterfall News Dainik Gomantak
गोवा

Goa News: तीन वर्षांत चार जणांचे बळी; तोणीर धबधब्याबाबत वाळपई पोलीस सतर्क

Valpoi Waterfall: वाळपई पोलिसांकडून वनखाते, सावर्डे पंचायत आणि जलसिंचन खात्याला पात्र पाठवून तोणीर धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात यावा अशी मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi, Goa

वाळपई: सत्तरी तालुका हा बऱ्यापैकी शांतात, निसर्गसंपन्नता यासाठी ओळखला जातो. इथे असलेल्या धबधब्यांना भेट देण्यासाठी ठिकठिकाणहून पर्यटक येत असतात. वाळपई सत्तरी येथील सावर्डे पंचायत क्षेत्रातील तोणीर या ठिकाणी असलेल्या धबधब्यावर गेल्या दोन तीन वर्षांपासून अनेक बळी गेल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे आणि म्हणूनच आणखीन असे प्रकार घडू नयेत या दृष्टीने पावलं उचलत वाळपई पोलिसांकडून वनखातं, सावर्डे पंचायत आणि जलसिंचन खात्याला पात्र पाठवून हा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात यावा अशी मागणी केली जाणार आहे.

सावर्डे ग्रामपंचायतीत येणाऱ्या या धबधब्यावर गेल्या तीन वर्षांत चार बळी गेले आहेत. गेल्यावर्षी वास्को येथील दोन तर पंधरा दिवसांपूर्वीच पंकज राजपूत नावाच्या एका इसमाने जीव गमावला आहे.

हा धबधबा अनेकांसाठी मृत्यूचा सापळा बनत असल्याचं लक्षात घेत पोलिसांकडून पर्यटकांसाठी धबधबा कायमचा बंद ठेवण्याचा विचार सुरू झालाय. करंझोळ, कुमठोळ येथील ग्रामस्थांनी बैठक घेत सदर धबधबा बंद करावा अशी मागणी सरकारकडे केली होती मात्र अद्याप यावर सरकारने निर्णय जाहीर केलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

SCROLL FOR NEXT