55th Iffi Festival In Goa: इफ्फीत ऑस्ट्रेलियाला “कंट्री ऑफ फोकस” नामांकन; सिनेरसिकांना होणार ऑस्ट्रेलियन चित्रपटांच्या जागतिक योगदानाची ओळख!

Australia Country of Focus: पुढील महिन्यात होणाऱ्या ५५ व्या इफ्फीत ऑस्ट्रेलियाला “कंट्री ऑफ फोकस” म्हणून नामांकन मिळाले आहे.
55th Iffi Festival In Goa
55th Iffi Festival In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: पुढील महिन्यात होणाऱ्या ५५ व्या इफ्फीत  ऑस्ट्रेलियाला  “कंट्री ऑफ फोकस” म्हणून नामांकन मिळाले आहे. ऑस्ट्रेलियन चित्रपटांच्या जागतिक चित्रपट उद्योगातील प्रभावशाली योगदानाची ओळख त्यातून या इफ्फीत सिनेरसिकांना होणार आहे.

ऑस्ट्रेलियन चित्रपटांची समृद्ध परंपरा आणि त्यांच्या नवोन्मेषी सिनेमॅटिक तंत्राचा हा विशेष सन्मान असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे यापूर्वीच दृक-श्राव्य सह-उत्पादन कराराचे सदस्य आहेत.

"कंट्री ऑफ फोकस" हा इफ्फीचा प्रमुख विभाग आहे. या विभागात निवड झालेल्या देशाचे सर्वोत्कृष्ट समकालीन चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी इफ्फी महत्वाचे व्यासपीठ प्रदान करते. ऑस्ट्रेलियाची वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवणाऱ्या चित्रपटांनी सिनेरसिकांवर प्रभाव टाकला आहे,

“कंट्री ऑफ फोकस” विभागात काळजीपूर्वक निवडण्यात आलेले सात ऑस्ट्रेलियन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्यात खिळवून ठेवणाऱ्या थ्रिलर्सपासून हलक्या-फुलक्या विनोदी चित्रपटांपर्यंत, विविध शैलींचे चित्रपटांचा समावेश आहे.

55th Iffi Festival In Goa
55th Iffi Festival In Goa: यंदाचा इफ्फी महोत्सव महिन्यावर येऊन ठेपला; प्रतिनिधी नोंदणीस उस्फूर्त प्रतिसाद!

सिनेमॅटोग्राफर जॉन सीएल यांचा मास्टरक्लास

मॅड मॅक्स: फ्युरी रोड आणि इंग्लिश पेशंट यासारख्या महत्त्वाच्या चित्रपटांमुळे ओळखले जाणारे आणि अकॅडमी पारितोषिक विजेते सिनेमॅटोग्राफर जॉन सीएल यांचा मास्टरक्लास हे या इफ्फीचे मुख्य आकर्षण असेल.

हे सत्र उदयोन्मुख चित्रपट निर्माते आणि चित्रपट क्षेत्रात स्वारस्य असणार्‍यांना अमूल्य तांत्रिक अंतर्दृष्टी प्रदान करणारे ठरेल.

55th Iffi Festival In Goa
IFFI Delegate Registration: तुमची उपस्थिती अगत्याची! 'इफ्फी'च्या प्रतिनिधी नोंदणीस सुरुवात; जाणून घ्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया

अधिकृत प्रवेशिका ‘होम बिफोर नाईट’

इफ्फीच्या पार्श्वभूमीवर आयोजित दक्षिण आशियाई चित्रपट सृष्टीच्या सर्वात मोठ्या ‘फिल्म बझार’  मध्ये यंदा ऑस्ट्रेलियन चित्रपट सृष्टीचा मोठा सहभाग असेल,  ऑस्ट्रेलियातील चित्रीकरणासाठी योग्य स्थळे आणि प्रोत्साहनपर सवलती याबद्दल फिल्म बझारमध्ये  माहिती दिली जाईल. ‘होम बिफोर नाईट’ या ऑस्ट्रेलियन प्रकल्पाची सह-निर्मिती बाजारपेठेतील अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com