goa police Dainik gomantak
गोवा

Valpoi Bike Crackdown: विना परवाना गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन दुचाकीस्वारावर पोलिसांची कारवाई!

Valpoi Underage Riders: वाहतूक परवाना नसताना दुचाकी चालविणाऱ्या चार विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर दुचाकीसह ताब्यात घेतले.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: वाळपई परिसरात अल्पवयीन दुचाकी चालविणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. वाहतूक परवाना नसताना दुचाकी चालविणाऱ्या चार विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर दुचाकीसह ताब्यात घेतले.

त्या विद्यार्थ्यांना नंतर पोलिस स्थानकात पालकांसह बोलविले. मात्र, पकडलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांना समज देऊन पहिली वेळ म्हणून सोडून देण्यात आले. पण यापुढे वाहतूक परवाना नसताना विद्यार्थी आढळल्यास, विद्यार्थी (Student) व संबंधित पालकांवर कायदेशीर कारवाई करत दंड आकारला जाणार आहे. त्यासाठी वाळपई पोलिस सर्व शाळांना पत्र पठवून सूचना करणार आहेत करणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी वाळपई पोलिस स्थानकात दिली. यावेळी त्यांच्यासोबत वाळपई पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर उपस्थित होते.

पालकांना दिली सूचना

दळवी म्हणाले की, दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांवर आळा बसला पाहिजे. जोपर्यंत कारवाही होत नाही, तोपर्यंत मुलांना व पालकांना समाज येणार नाही. वाळपई भागात मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले दुचाकी घेऊन फिरताना आढळत आहेत त्यामुळे आज वाळपई बाजारात पोलिसांतर्फे ही कारवाई करण्यात आली. यावेळी पालक व विद्यार्थ्यांना दळवी यांनी सूचना केल्या तसेच पालक मुलांना अल्पवयीन असूनही वाहन देतात त्यामुळे तुमच्यावर सर्वांत आधी कारवाई केली जाईल, अशी सूचना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arun Gawli: गँगस्टर अरुण गवळीला दिलासा! शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

रानडुकरांसाठी लावलेल्या तारेचा शॉक लागला; गणपती घरी आले त्याच दिवशी सख्या भावांचा मृत्यू झाला Video

बाईक व्यवस्थित लावण्यास सांगितले म्हणून पे – पार्किंग कर्मचाऱ्यांवर 5 जणांकडून सुरी हल्ला, गणेश चतुर्थीला म्हापशात घडली घटना

Viral Video: दोन सांडांच्या भांडणात निष्पाप मुलीचा अपघात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “टार्गेट पूर्ण!”

Mohammed Shami: ‘मी क्रिकेट सोडून देईन!’… मोहम्मद शमी जेव्हा निवृत्ती घेणार होता, भरत अरुण यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT