
Goa Traffic Police
पणजी: नियम मोडल्याच्या नावाखाली चार वाहतूक पोलिसांनी पर्यटकांना अडवून केलेली कारवाई नियमाचे उल्लंघन करणारी होती. त्यामुळे त्याची चौकशी उत्तर गोवा पोलिस उपअधीक्षकांमार्फत करण्यात येत आहे. या चौकशीच्या काळात त्यांची बदली गोवा राखीव पोलिस दलात (जीआरपी) करण्यात आली. त्यांच्यावरील आरोपामध्ये चौकशीत ते दोषी आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.
ड्युटीवर असलेल्या एका साहाय्यक उपनिरीक्षक राजन म्हामल व तीन पोलिस हवालदार विश्राम मलिक, संजय गावडे व रुपेश राऊत हे हडफडे येथील परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर नजर ठेवून होते.
गोव्यात (Goa) आयपीएस असलेल्या अधिकाऱ्याची ओळख असलेले तरुण युवक दोन वेगवेगळ्या दुचाकीवरून फिरत होते. त्यातील एका दुचाकीवर दोनपेक्षा अधिक स्वार असल्याने पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असता या युवकांनी आपली गोव्यात असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याशी असलेली ओळख सांगण्यात सुरुवात केली. मात्र पोलिस आपल्या निर्णयाशी ठाम राहिले. पोलिसांनी त्यांच्याकडून पैसे मागितले नाहीत तसेच अरेरावीची भाषा वापरली नाही.
दरम्यान, या प्रकरणाची दखल गोव्यातील या युवकांशी ओळख असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने घेऊन त्याची चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ही चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याविरुद्ध पर्यटकांशी गैरवर्तणूक केल्याचा कथित आरोप आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.