बाईक व्यवस्थित लावण्यास सांगितले म्हणून पे – पार्किंग कर्मचाऱ्यांवर 5 जणांकडून सुरी हल्ला, गणेश चतुर्थीला म्हापशात घडली घटना

Mapusa Crime News: बाईक व्यवस्थित पार्क न केल्याने येथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी बाईक व्यवस्थित लावण्यास सांगितले. यामुळे संतापलेल्या संशयिताने कर्मचाऱ्यावर हल्ला करत मारहाण केली.
Ganesh Chaturthi crime in Goa
Bike parking dispute MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: खासगी सशुल्क पार्किंगमध्ये दोन कर्मचाऱ्यांना पाच जणांच्या टोळक्याने मारहाण करुन सुरी हल्ला केल्याची घटना घडली. मरड, म्हापसा येथे गणेश चतुर्थीच्या दिवशी (२७ ऑगस्ट) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. पार्किंगमध्ये बाईक व्यवस्थित लावण्यास सांगितल्यावरुन हा वाद झाला.

याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, एकजण फरार आहे. भूवन गोवेकर (१८), दशरथ गोवेकर (२५), रुपसाई आरोंदेकर (१८) आणि अनिकेत शिरोडकर (१८) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर, एक संशयित फरार आहे. पोलिसांनी याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

Ganesh Chaturthi crime in Goa
Shaktipeeth Expressway: कोल्हापूरला वगळलं; शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनासाठी सरकारकडून आदेश जारी

मिळालेल्या माहितीनुसार, मरड म्हापसा येथील रिजीम प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये सशुल्क खासगी पार्किंगची सोय आहे.  संशयितांपैकी एकाने बाईक व्यवस्थित पार्क न केल्याने येथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी बाईक व्यवस्थित लावण्यास सांगितले. यामुळे संतापलेल्या संशयिताने कर्मचाऱ्यावर हल्ला करत मारहाण केली.

Ganesh Chaturthi crime in Goa
धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या मुलीने सरकारी शाळेच्या वॉशरुममध्ये दिला बाळाला जन्म

यानंतर संशयिताने त्याच्या अनेक साथीदारांना घटनास्थळी बोलावून कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच, सुरुने हल्ला केला. संशयितांना दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करुन घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत असून, घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com