Valpoi Police Raid At Illegal sand Mining at Naneli Sattari Dainik Gomantk
गोवा

Illegal Sand Mining: वाळपई पोलिसांची धडक कारवाई! अवैध रेती उत्खननप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल; ट्रक, इतर साधने जप्त

Valpoi Police Raid: वाळपई पोलिसांनी नानेली-सत्तरी येथे अवैध रेती उत्खननप्रकरणी छापा टाकून सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एक टाटा टिप्पर ट्रक (जीए-०४-टी-२१०६) आणि रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी साधने जप्त करण्यात आली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Police Raid At Illegal sand Mining at Naneli Sattari

वाळूपई: वाळपई पोलिसांनी नानेली-सत्तरी येथे अवैध रेती उत्खननप्रकरणी छापा टाकून सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एक टाटा टिप्पर ट्रक (जीए-०४-टी-२१०६) आणि रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी साधने जप्त करण्यात आली आहेत.

डिचोली उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक खुशाली नाईक आणि त्यांच्या पथकाला नगरगाव परिसरात गस्त घालत असताना रेती उत्खननाच्या अवैध कामाची माहिती मिळाली. तत्काळ नानेली येथील कालिका नदीकाठावर पोहोचल्यावर, चार मजूर वाळू उत्खनन करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याठिकाणी एका महिलेने मजुरांना रेती उत्खननाचे काम दिल्याचे स्पष्ट झाले. पोलिस उपनिरीक्षक खुशाली नाईक यांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहन आणि उपकरणे जप्त केली.

याप्रकरणी संगीता नाईक, शंकर भगत, राजीव कुमार (२६), सकिंद्र दि. उमेश राजक, असरश दि. धथुरी भगत, उदय दि. चंद्रकांत परवार यांच्यावर गोवा दमन आणि दीव लघु खनिज अधिसूचना नियम, १९८५ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाळपई पोलिस ठाण्याच्या सनीशा नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

दरम्यान, सत्तरीत म्हादई नदीच्या खोऱ्यात बेकायदेशीर रेती उत्खनन करण्याचे काम खुलेआम सुरूच आहे. त्यात काही दिवसांपूर्वी सावर्डे येथे रेती उत्खनन करताना एका महिलेचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kushavati District: ‘कुशावती’बाबत नवीन अपडेट! भाडेकरू, हॉटेल कामगारांच्या पडताळणीचे आदेश; ओळखपत्राची सक्ती

1106 च्या ताम्रपटात उल्लेख असलेला गंडगोपाळ तलाव, करमळीचे सुलभातीचे तळे; गोवापुरीच्या जलव्यवस्थापनाचा लौकिक पुन्हा गवसेल?

Madhav Gadgil: खाण परिस्थिती नियंत्रणात आहे की नाही? गोव्यावर भरभरून प्रेम करणारे 'माधव गाडगीळ'

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT