Valpoi Dainik Gomantak
गोवा

Valpoi: वाळपईतील रुग्णांसाठी 'फिजिओथेरपी' वरदान, वर्षभरात शेकडो रुग्‍णांना लाभ; 3200 उपचार सत्रांचे आयोजन

Valpoi Physiotherapy Unit: वाळपईतील सामाजिक आरोग्य केंद्रामध्ये एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या फिजिओथेरपी युनिटने यशस्वीपणे आपला पहिला वर्षपूर्तीचा टप्पा पूर्ण केला आहे.

Sameer Amunekar

वाळपई: वाळपईतील सामाजिक आरोग्य केंद्रामध्ये एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या फिजिओथेरपी युनिटने यशस्वीपणे आपला पहिला वर्षपूर्तीचा टप्पा पूर्ण केला आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या केंद्राचा लाभ आतापर्यंत शेकडो रुग्‍णांनी घेतला असून, ३२०० हून अधिक उपचार सत्रे झाली.

या केंद्रात विविध प्रकारच्या फिजिओथेरपी उपचार सुविधा उपलब्ध असून, वाळपईसह संपूर्ण सत्तरी तालुक्यातील रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत. दरमहा सरासरी ३०० रुग्ण या केंद्रात येतात. मणक्याचे आजार, सांधेदुखी, स्नायूंचे विकार, फ्रॅक्चरनंतरचे पुनर्वसन अशा अनेक प्रकारांतील उपचार येथे अत्याधुनिक उपकरणांद्वारे मोफत दिले जात आहेत.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या पुढाकाराने व पाठपुराव्यामुळे सुरू झालेले हे केंद्र आता ग्रामीण भागातील रुग्णांसाठी उपयुक्ततेचे ठिकाण बनले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वाळपई आरोग्य क्रेंदात स्वतंत्र असे फिजिओथेरपी सेंटरची सुरुवात झाली.

पुर्वी जवळपास ही सुविधा नसल्याने रुग्णांना म्हापसा जिल्हा रुग्णालयात किंवा गोमेकॉत जावे लागत होते. वर्षपूर्ती निमित्त होत असल्याने आरोग्याधिकारी डॉ. विकास नाईक, अकिब शेख आणि डॉ. अजून गावस यांनी माहिती दिली.

डॉ. विकास नाईक म्‍हणतात...

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी आरोग्य केंद्राची गरज समजून येथे सुरू केले आहे. फिजिओथेरपी सेवा सर्वांसाठी सुलभ व मोफत मिळावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

ब्रेन स्टोक, ब्रेन हॅमेरेज, अपघात झालेले रुग्ण येथे येऊन बरे होऊन जातात आणि त्यांच्याकडून मिळणारा चांगला प्रतिसाद यामुळे खूप समाधानी वाटते. येथे लहान मुलापासुन ते वृध्दापर्यंतचे रुग्ण याचा लाभ घेत आहे.

येथे एका वर्षात ३२०० हून अधिक उपचार सत्रे झाली आहेत. फिजिओथेरपी सेंटरमध्ये व्यायाम थेरपी आणि इलेक्ट्रोथेरपीसह अनेक सेवा प्रदान करण्यात आलेली आहे, न्यूरोलॉजिकल, मस्कुलोस्केलेटल, स्पोर्ट्स दुखापती आणि पोस्टऑपरेटिव्ह पुनर्वसन आदींची सेवेसाठी मोठ्या संख्येने दररोज रुग्ण येतात. - डॉ. अनुजा गावस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

SCROLL FOR NEXT