Valpoi Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Valpoi Municipal Council: वाळपई उपनगराध्यक्ष पदासाठी इद्रुस शेख यांची बनविरोध निवड

माजी उपनगराध्यक्ष अनिल काटकर यांनी दिला होता राजीनामा

दैनिक गोमन्तक

Valpoi Municipal Council: वाळपई नगरपालिकेच्या नवीन उपनगराध्यक्ष पदासाठी आज शुक्रवार दिनांक 21 रोजी वाळपई नगरगरपालीकेच्या कार्यालयात संपन्न झालेल्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक इंद्रुस (फयाज) शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अनिल काटकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. काही दिवसापुर्वी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता. यामुळे नवीन उपनगराध्यक्ष पदा निवडायचा मार्ग मोकळा झाला.

आज झालेल्या निवडणुकीवेळी सत्तरी उपजिल्हाधिकारी प्रविण परब यांनी निवडणुकीची प्रक्रिया पुर्ण केली. यावेळी उपनगराध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने शेख इद्रुस यांची बिनविरोध निवड झाल्याचे प्रविण परब यांनी जाहिर केले.

यावेळी वाळपई मुख्याधिकारी दशरथ गावस, नगराध्यक्ष शैहजीन शेख, नगरसेवक अनिल काटकर, प्रसन्ना गावस, शराफत खान, सय्यद सरफराज, रामदास शिरोडकर, सौ. साखळकर, विनोद हळदणकर आदी नगरपालिका पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

इद्रुस यांचे यावेळी पुष्पहार घालून व त्यांच्या कार्यालयात खुर्चीवर विराजमान करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष शैहजीन शेख म्हणाल्या, वाळपई नगरपालिकाचा कारभार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या सहकार्यामुळे पुढे जात आहे. वाळपई नगरपालिका क्षेत्रात राणे मुळे अनेक विकास कामा मार्गी लागल्या आहेत. त्यामुळे आम्ही नगरपालिका मंडळ सदैव राणे सोबत रहाणार असुन वाळपईच्या विकास करण्यासाठी एकजुटीने सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

इद्रुस शेख म्हणाले, यापुर्वी सुध्दा आपल्याकडे उपनगराध्यक्षप होते. त्यावेळी सुध्दा आपण वाळपईच्या विकासासाठी, बेरोजगाराना नोकरी त्याचबरोबर आपल्या वाड्यावरील विकास कामाना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला होता. आपण व आपले कार्यकर्ते सदैव राणे सोबत रहाणार आहोत. त्यांच्यामुळे वाळपईचा विकास झाला आहे आणि होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup 2025: जल्लोष! FC Goa सुपरडुपर हिट; सलग दुसऱ्यांदा जिंकला कप, अनेक विक्रमांना गवसणी

Arpora: ‘रोमियो लेन’बाबत धक्कादायक माहिती! 15 दिवसांत बांधकाम पाडण्याचा दिला होता आदेश; आगीस पंचायत खाते, CZMA जबाबदार

आग भडकली, धावपळ सुरु झाली, 40 सेकंदात सर्व काही संपले! हडफडे दुर्घटनेप्रकरणी तिघे निलंबित; मालकाच्या अटकेसाठी पोलीस दिल्लीत

Partgali Math: सुमारे 1000 वर्षांपूर्वी सारस्वत ब्राह्मण गोव्यात आले, 550 वर्षांपूर्वी वैष्णवांनी पर्तगाळीत मठ बांधला..

Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी खास! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे भविष्य!

SCROLL FOR NEXT