Valpoi Mhadei River Youth Death Dainik Gomantak
गोवा

Tragic Death: ..आणखी एक बळी! आंघोळीसाठी नदीत गेला, तो आलाच नाही; म्हादई पात्रात तरुणाचा बुडून मृत्यू

Valpoi Mhadei River Youth Death: रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. रात्री ८.३५ वाजता शोधमोहीम थांबविण्यात आली. सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: येथील नवोदय विद्यालयाजवळील म्हादई नदीच्या पात्रात एका तरुणाच्या बुडण्याची घटना सोमवारी सायंकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास घडली. बुडालेल्या तरुणाचे नाव मबुली पटेल (२७) असे असून तो मडगाव येथील आहे.

घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. रात्री ८.३५ वाजता शोधमोहीम थांबविण्यात आली. सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

या शोधकार्यात अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावस, एलएफएफ अरविंद देसाई, डीपीटी अशोक नाईक, फायर फायटर कलीदास गावकर, ज्ञानेश्वर सावंत, साईनाथ सावंत, प्रतेश गावकर, वरिष्ठ फायर फायटर दत्ताराम देसाई तसेच ऑफ-ड्युटी फायर फायटर उमेश गावकर आणि स्वप्निल धालवी यांनी सहभाग घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, ईदनिमित्त शनिवारी मबुली पटेल हा वाळपई येथे आपल्या पाहुण्यांकडे आला होता. संध्याकाळी आंघोळीसाठी नदीपात्रात गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सोहम मळीक पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, म्हादई पात्रातील बहुतेक बंधारे अडवलेले असल्याने नदीतील पाण्याचा अंदाज येत नाही. उन्हाळा सुरू झाल्याने सध्या अनेक लोक या नदीवर आंघोळीसाठी येतात. काहीजण नशापाणी करून दंगामस्तीही करतात व नाहक आपला जीव गमावून बसतात. त्यामुळे बंधारा परिसरात नदीपात्रात उतरण्यावर सरकारने बंदी घालावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT