Valpoi Dainik Gomantak
गोवा

वाळपईत विकासाच्या गतीला अडथळे, मूलभूत समस्या कायम; वाहतूक कोंडीचा त्रास, पालिकेकडून ठोस कृतीची मागणी

Valpoi: वाळपई शहरात सरकारकडून विविध विकासकामांना गती दिली जात असली, तरी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक मूलभूत समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: वाळपई शहरात सरकारकडून विविध विकासकामांना गती दिली जात असली, तरी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक मूलभूत समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत.

वाहतूक कोंडी, पार्किंगची कमतरता आणि अपूर्ण वाहतूक नियोजन यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

पालिकेकडून वाहतूक आराखडा तयार केला जातो, तसेच बैठका घेऊन नियोजनही केले जाते. मात्र, प्रत्यक्षात या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शहरातील कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नागरिक विश्वेश प्रभू यांनी सांगितले की, अनेकवेळा लेखी स्वरूपात पालिकेचे या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे; परंतु अद्याप ठोस कृती दिसून आलेली नाही.

स्वच्छतेच्या बाबतीत वाळपई पालिका चांगले काम करताना दिसते. दररोज घराघरांतून कचरा गोळा केला जातो तसेच रस्त्यांवरील कचरा उचलला जातो. गोळा केलेला कचरा सय्यदनगर येथील कचरा प्रकल्पावर नेऊन त्याचे योग्य विलगीकरण केले जाते. तरीदेखील काही नागरिक प्लास्टिक कचरा गटारात किंवा रस्त्याच्या कडेला टाकत असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा अडतो आणि अस्वच्छतेचे प्रमाण वाढते.

दरम्यान, भटक्या गुरांचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांमुळे अपघात घडत असून व्यापाऱ्यांच्या मालाची नासधूस होत आहे. आठवडा बाजाराच्या दिवशी ही समस्या अधिक तीव्र होते. त्यामुळे पालिकेने अशा गुरांवर नियंत्रण ठेवून त्यांना ताब्यात घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.

शहरात ‘सीसीटीव्ही’ बसवा!

घरातील सांडपाणी थेट गटारात सोडण्याचे प्रकारही वाढले असून, यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता देखील व्यक्त होत आहे. यामुळे चोरी, अपघात यांसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्यास मदत होईल.

कामे पारदर्शकपणे व्हावीत!

सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत आणि पारदर्शकपणे व्हावीत, कोणत्याही प्रकारचा पक्षपात होऊ नये, तसेच बेकायदेशीर बांधकामांना आळा घालावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक सदानंद (नंदा) काणेकर यांनी व्यक्त केली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने ठोस आणि प्रभावी पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT