Minister Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : हेडगेवार विद्यालयाला राणेंकडून २ कोटींची देणगी

Valpoi News : नवीन वास्तूचे लोकार्पण ः राष्ट्रभक्ती जागविण्याचे संस्थेचे कार्य ः श्रीपाद नाईक

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई, डाॅ. केशव बळीराम हेडगेवार या शिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक बनविण्याबरोबरच त्यांच्या हृदयात राष्ट्रभक्ती जागविण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

वाळपई येथील डॉ. के. ब. हेडगेवार शिक्षण संस्थेच्या वाळपईतील विद्यालयाच्या नवीन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या विद्यालयाला २ कोटींची देणगी जाहीर केली आहे.

यावेळी व्यासपीठावर हेडगेवार विद्यालयाच्या प्रमुख व्यवस्थापनचे सचिव सुभाष देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेंद्र भोबे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डाॅ. अशोक आमशेकर, प्रकाश गाडगीळ, निलांगी शिंदे उपस्थित होत्या. श्रीपाद नाईक पुढे म्हणाले, की ही शाळा म्हणजे संस्काराची शिदोरी असून देशात राष्ट्रप्रेमी नागरिक तयार करण्याचे कार्य या विद्यालयाच्या शैक्षणिक व्यवस्थेतून होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात देशासाठी हा महत्त्वाचा आधार ठरणार आहे.

सुभाष देसाई म्हणाले, हेडगेवार विद्यालयाने समाजातील अनेक घटकांकडून विद्यालयाला सहकार्य लाभत आहे. डाॅ. अशोक आमशेकर म्हणाले, तीन वर्षांपूर्वी वाळपईत सुरू केलेली या शाळेला अल्पकाळात मोठा प्रतिसाद लाभला आहे.

आज समाजातील दानशूरांकडून मिळालेल्या भरीव योगदानामुळे आपल्या हक्काची वास्तू विद्यालयाला मिळू शकली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या स्तरावर महत्त्वाचे योगदान देणाऱ्या दानशूरांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका निलांगी शिंदे यांनी केले. स्वागत डाॅ. अशोक आमशेकर यांनी केले, तर प्रकाश गाडगीळ यांनी आभार मानले.

यापुढेही शाळेला सहकार्य करणार ः विश्वजीत राणे

वाळपईत हेडगेवार शिक्षण संस्थेच्या नवीन वास्तूचे आज दिमाखात लोकार्पण करण्यात आले. तत्पूर्वी स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी संस्थेला २ कोटी रुपयांची भरीव देणगी जाहीर केली. सकाळी शाळेच्या व्यवस्थापकांना फोन करून राणे यांनी ही देणगी जाहीर केली. सत्तरीत शिक्षणाच्या प्रगतीसाठी यापुढेही सढळ हस्ते मदत करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. दरम्यान, सत्तरीतील अनेक शाळांत मॉडर्न स्कूल करण्याकडे त्यांचा भर आहे. त्यामुळे आज त्यांनी जाहीर केलेल्या भरीव देणगीमुळे त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT