Vagator Accident Update Dainik Gomantak
गोवा

Vagator Accident Update: वागातोर अपघात प्रकरणातील कारचालकाचा अमली पदार्थ चाचणी अहवाल समोर

आरोग्यसेवा संचालनालय आणि पॅथॉलॉजी विभागाच्या अहवालातून हे स्पष्ट

Kavya Powar

Vagator Accident Case Update: वागातोर येथील अपघातात एका रिसॉर्टच्या मालकीणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील अटक संशयित कारचालक सचिन कुरुप (42, आसगाव, मूळ-पुणे) याच्या मद्य चाचणीनंतर आता अमली पदार्थ चाचणी देखील निल आली आहे.

हा घटनेच्या दिवशी चालक दारु पिऊन गाडी चालवत असल्याचे बोलले जात होते. मात्र काही दिवसांपूर्वी अल्कोहोल चाचणी केली असता चाचणी शून्य असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. आरोग्यसेवा संचालनालय आणि पॅथॉलॉजी विभागाच्या अहवालातून हे स्पष्ट झाले.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला (11 नोव्हेंबर) वागातोर येथील मायोर रोमा रिसॉर्टच्या (Maior Roma Resort) मालकीण रेमाडिया मारिया या रिसॉर्टच्या बाहेर फोनवर बोलत उभ्या होत्या. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने SUV कार रिसॉर्टमध्ये घुसली ज्यामध्ये रेमाडिया यांचा जागीच मृत्यू झाला.

कार चालक हा अमलीपदार्थाच्या आहारी गेला असल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले असल्याचे बोलले जात होते. मात्र चालकाची अल्कोहोल आणि नार्कोटिक चाचणी शून्य आल्याने, या प्रकरणाला आता वेगळेच वळण प्राप्त झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fight Video: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! डेव्हिड वॉर्नर आणि मोईन अलीमध्ये जुंपली, पाहा व्हिडिओ

Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

धोकादायक वळण अन् चालकाची मस्ती! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

"अश्लील फोटो पाठवले आणि...", 'WWE'मध्ये मोठी खळबळ, सुपरस्टार खेळाडूवर लैंगिक शोषणाचे आरोप

"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

SCROLL FOR NEXT