Goa Accident Death : दहा महिन्यांत अपघातांचा उच्चांक

Goa Accident Death : अनेकांनी गमावले प्राण : वेर्णा आघाडीवर, फोंडाही ट्रक अपघातात अग्रेसर
Goa Accident Death
Goa Accident Death Dainik Gomantak

नितीन गावणेकर

Goa Accident Death : फातोर्डा. राज्यात अपघातांची संख्या वाढत चालली आहे. यात २११ अपघात हे वेर्णा येथील महामार्गावर घडले आहेत. त्यानंतर पणजीत २१० व पर्वरी येथे १९८ अपघात घडले आहे. वेर्णा येथे अपघातात बळी पडण्याची संख्या सर्वात जास्त असून या २० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

त्यानंतर डिचोली येथे १६, फोंडा व वास्को येथे प्रत्येकी १६ व कुडतरी येथे १४ जणांचा अपघातात बळी गेलेला आहे. हे सर्व अपघात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान घडले आहेत.

बस अपघातांची सर्वाधिक २१ प्रकरणे राजधानी पणजी येथे घडलेली आहेत. त्यानंतर वेर्णा येथे १४ अपघात झाले आहेत. ओल्ड गोवा येथे १२ व पर्वरी येथे ९ अपघातांची प्रकरणे घडली आहेत. सर्वाधिक ट्रक अपघाताच्या यादीत फोंडा तालुका अग्रेसर असून ३१ ट्रक अपघात घडले आहेत. त्यानंतर पर्वरी येथे २६ अपघात घडले आहे.

मायना कुडतरी व काणकोण येथे प्रत्येकी १८ अपघातांची प्रकरणे घडली आहेत. गेल्या दहा महिन्यांतील अपघातांची ही आकडेवारी चिंताजनक आहेत. रस्ता बळींचे प्रमाणही वाढत चालले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी आता ठोस उपाययोजना आखणे आवश्‍यक झाले आहे.

Goa Accident Death
Goa Petrol-Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे दर जैसे थे; जाणून घ्या इंधनाचे ताजे भाव

दुचाकी वाहनांना होणारे अपघात चिंताजनक

दुचाकी वाहनांना होणारे अपघातही चिंताजनक असून मायना कुडतरी पोलिस हद्दीत १४५ अपघात, त्यानंतर फोंडा येथे ११३, वेर्णा येथे १११ व पणजी येथे ९९ अपघातांची नोंद झाली आहे. यातील बहुतेक अपघात निष्काळजीपणे वाहन चालविण्याच्या प्रकरणामुळे घडले आहेत.

यातील ४०.३७ वाहन अपघात राष्ट्रीय महामार्गावर व अन्य ७७.३६ अपघात अंतर्गत रस्त्यावर घडले आहेत. तसेच अन्य १२.८२ अपघात वळणावर योग्य दिशा दर्शक फलक नसल्याने घडले आहेत. ही माहिती वाहतूक नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

सर्वाधिक अपघात चारचाकी वाहनांना

चारचाकी वाहनांनी अपघातात उच्चांक गाठलेला आहे. चालू वर्षात चारचाकी वाहनांचे १००० वर अपघात घडले आहे. यात पणजीत २५३, पर्वरी येथे २०३, वेर्णा येथे १५४, कुडतरी येथे ९५, आगाशी येथे ९३ व फोंडा येथे ८३ अपघात चारचाकी वाहनांना झाल्याची नोंद आहे.

वाहन चालविण्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे. प्रत्येक वाहन चालकाने सावधगिरी बाळगून वाहन चालविल्यास अपघात घडण्याची शक्यता कमी आहे.

- चेतन कवळेकर, वाहतूक पोलिस निरीक्षक

वाहनचालक बेशिस्तीने वाहन चालवीत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी वाहतूक पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

- फिलॉमेंन कोस्ता, वाहतूक पोलिस निरिक्षक, कोलवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com