vaddem vasco landslide Dainik Gomantak
गोवा

Vasco Landslide: वाडे-वास्‍कोत कोसळली दरड! घराला धोका; कुटुंब जगतेय भीतीच्‍या छायेखाली

Vaddem vasco landslide: सदर ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना होत असल्याने तेथे प्रतिबंधक उपाय म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात येणार असल्‍याचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले.

Sameer Panditrao

वास्को : वाडे-वास्‍को येथील दीपक गोसावी यांच्या घरामागे असलेल्या डोंगराची लहान दरड शनिवारी सकाळी कोसळली. या दरडीसह आलेली माती व एक खडक अग्निशमन दलाने हटविले. सदर भागात दरडी कोसळण्याच्या घटना यापूर्वीही घडल्‍या आहेत.

सदर ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना होत असल्याने तेथे प्रतिबंधक उपाय म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात येणार असल्‍याचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले. संरक्षक भिंतीचे काम सुरू होईपर्यंत तेथे इतर मार्गाने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.

वाडे येथील गोसावी यांच्या घरामागे लहान दरड कोसळण्याने त्यांनी त्वरित अग्निशमन दल, स्थानिक आमदार यांना कळविले. सदर माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच आमदार साळकर तेथे पोहोचले.

दीपक गोसावी, पीडित

दरड कोसळण्याची भीती दररोज सतावत असते. यापूर्वीही दरड कोसळून आमच्‍या घराची भिंत कोसळली होती. तेथे दरड कोसळू नये यासाठी आम्ही प्लास्टिक घातले आहे. तथापि, पाणी झिरपून दरड कोसळत आहे. आमदार दाजी साळकर यांनी तेथे संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्‍‍वासन दिले आहे.

दाजी साळकर,आमदार (वास्‍को)

सदर ठिकाणी संरक्षक भिंत लवकरात लवकर बांधून देण्‍यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. या भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. तेथे संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू असून ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून हे काम करण्‍यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT