Goa Landslide: पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गोव्यात दुर्घटना, दरड कोसळून दोन घरांचे नुकसान

Goa Landslide News: हवामान खात्याने राज्यात पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
House Damaged In Goa Landslide
Goa LandslideDainik Gomantak
Published on
Updated on

Landslide News Goa: गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मे महिन्याच्या अखेरीस जोरदार बॅटींग केलेल्या पावसाने जूनच्या सुरुवातीला काहीसा ब्रेक घेतला. दरम्यान, हलक्या पावसात उसगाव येथे घराच्या मागील दरड कोसळून दोन घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील कोणालाही इजा झालेली नाही.

House Damaged In Goa Landslide
Goa LandslideDainik Gomantak

मिळालेल्या माहितीनुसार, टाकीवाडा- उसगाव येथे प्रदीप पाल यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेली दरड रात्री दोनच्या सुमारास कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत घरातील कोणाली इजा झालेली नसून सर्वजण सुखरूप आहेत. पण, या परिसरात अजून दरड कोसळण्याचा धोका कायम आहे.

House Damaged In Goa Landslide
Panaji: पणजीवासीयांसाठी गुड न्यूज! रस्ते, सांडपाणी निचऱ्याची कामे संपली; पदपथ सौंदर्यीकरणासाठी 30 जूनपर्यंत मुदत
House Damaged In Goa Landslide
Goa LandslideDainik Gomantak

तसेच, उसगाव येथील सिद्धेश्वरनगरमध्ये घराच्या मागची संरक्षण भिंत कोसळून कविता हिरेमठ यांच्या घराचे नुकसान झाले आहे. तसेच, मनोहर दोत्रे यांच्या घराच्या समोरील भाग दुसऱ्या घरावर कोसळल्याने नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे हे नुकसान झाले आहे.

House Damaged In Goa Landslide
Goa Transport: कंडक्टर धावला देवदूतासारखा! 'कदंब'मध्ये हरवले पाकीट, बस वाहकामुळे सापडले परत; प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक
House Damaged In Goa Landslide
Goa LandslideDainik Gomantak

गोव्यात मुसळधार पावसात दरड कोसळण्यासह झाडांची तसेच वीज खाबांच्या पडझडीच्या घटना घडत असतात. यावेळी मान्सूनने लवकर हजेरी लावली असून, मे महिन्याच्या अखेर राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले.

त्यानंतर जूनच्या सुरुवातील उघडझाप करणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. हवामान खात्याने राज्यात पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com