Goa Dogs vaccination  Dainik Gomantak
गोवा

Goa Dogs vaccination: गोव्यात एकूण 6,000 श्वानांचे लसीकरण; जागतिक रेबीज दिनी सुरू झाली होती मोहिम

राजधानी पणजीत 86 श्वानांना बसवली मायक्रोचिप

Akshay Nirmale

Goa Dogs vaccination: गोव्यात जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी 28 सप्टेंबर हा जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, सुरू करण्यात आलेल्या मोहिमेतून गोव्यातील सहा तालुक्यात 6,000 कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले. यात 16 आमदार आणि 4 मंत्र्यांचे सहकार्य लाभले.

रेबीजचा सामना करणे आणि कुत्र्यांचे आरोग्य सुधारणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. 2013 मध्ये गोव्यात मिशन रेबीज लाँच करण्यात आले होते. दरम्यान, गोव्याची राजधानी पणजीमध्ये 86 पाळीव कुत्र्यांना मायक्रोचिप बसवण्यात आली आहे. दोन दिवसात ही मायक्रोचिप बसवली गेली आहे.

या मायक्रोचिपमध्ये एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. तो नंबर स्कॅन केल्यावर संबंधित कुत्र्याची सर्व माहिती उपलब्ध होते. त्यातून त्याच्या लसीकरणाची स्थिती काय आहे, संबंधित कुत्र्याच्या मालकाची माहिती त्यातून मिळते.

प्राण्यांचे डॉक्टर तसेच प्राणी अधिकारी हा नंबर स्कॅन करू शकतात. शिवाय हरवलेल्या श्वानांना त्यांच्या मालकापर्यंत परत पोहचविण्यासाठीही या मायक्रोचिपचा फायदा होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Foundational Learning Survey: पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचा आता 'लर्निंग सर्व्हे'; वाचन, लेखन अन् गणितातील पायाभूत कौशल्यांची कमतरता शोधणार

Rule Change: LPG सिलेंडर, FD, ATMपासून वाहनांच्या किमतीपर्यंत; 1 ऑक्टोबरपासून बदलले 6 मोठे नियम! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Goa Tourism: दाबोळीवर उतरले 162 रशियन 'पाहुणे'; 2026-27 पर्यटन हंगामातील पहिले चार्टर दाखल, गोव्यात जंगी स्वागत

Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

Rohit Sharma Celebration: 35वं वनडे शतक अन् रोहित शर्माचा हटके अंदाज! खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारताच हिटमॅन म्हणाला, 'हे माझ्यासाठी...' VIDEO

SCROLL FOR NEXT