Vaccination

 

Dainik Gomantak 

गोवा

गोव्यातील 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू

लसीकरण (Vaccination) संमती फॉर्मवर पालकांनी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात आज (सोमवार) पासून 15-18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आरोग्य विभागातील लसीकरण पथक राज्यभरातील 529 लसीकरण केंद्रांवर मुलांचे लसीकरण करेल.

"लसीकरण (Vaccination) संमती फॉर्मवर पालकांनी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. ख्रिसमसच्या सुट्टीनंतर सोमवार हा शाळांसाठी पहिला कामकाजाचा दिवस आहे. त्यामुळे कदाचित संमिश्र प्रतिसाद मिळेल," असे शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

गोवा सरकारने (Goa government) 72,000 मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सोमवारी ही मोहीम सुरू झाल्यानंतर चार दिवसांत उद्दिष्ट गाठण्याचा प्रस्ताव असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी रविवारी सांगितले.

ते पुढे म्हणाले, "आम्हाला 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी डोसचा साठा आधीच मिळाला आहे." लसीकरण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी (Students) स्वत:बरोबर कोणतेही सरकारमान्य ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना एक हेल्पलाइन नंबर प्रदान केला जाईल ज्यावर ते लसीकरणाबाबतच्या कोणत्याही स्पष्टीकरणासाठी संपर्क साधू शकतात."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT