पणजी : एनसीबी म्हणजेच अमलीपदार्थ विरोधी पथकाने गोव्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला छापे टाकले. यावेळी ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी (Goa Drug Case) दोन महिलांना पथकाने अटक केली आहे. दोन्ही आरोपी महिलांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही आरोपी महिलांची ओळख पटवण्यात आली असून याप्रकरणी त्यांची सखोल चौकशी केली जाणार असल्याचं एनसीबीने म्हटलं आहे.
एनसीबीच्या गोवा आणि मुंबईच्या पथकांनी गोव्यात संयुक्त कारवाईवेळी दोन महिलांना ताब्यात घेतलं. 31 डिसेंबरच्या रात्री बार्देश तालुक्यातील वाडे शिवोली परिसरातून मोठा ड्रग्जसाठा (Drugs) जप्त करण्यात आला आहे. यात तब्बल 1.030 ग्रॅम गांजा (49 गोळ्या), 25 ग्रॅम अँफेटामाईन, 2.2 ग्रॅम कोकेन, 1 ग्रॅम MDMA पावडरसह गाडीही जप्त करण्यात आली.
एनसीबीने (NCB) दिलेल्या माहितीनुसार एक गोवन महिला नायजेरियन महिलेच्या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री करत होती, असं चौकशीतून समोर आलं आहे. हीच महिला गोव्यात अमली पदार्थांचं रॅकेट चालवत होती. हे रॅकेट नववर्षाच्या पूर्वसंध्येला उत्तर गोव्यात (North Goa) पर्यटकांना ड्रग्ज पुरवण्याचं काम करत असल्याची माहितीही एनसीबीने दिली आहे. या रॅकेटमध्ये आणखी एका परदेशी नागरिकाचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे, ज्याला लवकरच अटक केली जाणार असल्याचं एनसीबीने म्हटलं आहे.
दरम्यान नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत तीन नायजेरियन नागरिकांना ड्रग्ज तस्करीप्रकरणी पकडण्यात आलं. त्यांच्याकडून तब्बल 3 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.