Arrest|Jail|Crime Canva
गोवा

Goa Crime: गोवा बीचवर ड्रग डिलचा प्लॅन झाला फेल, उझबेकिस्तानच्या महिलेला अटक

Goa Crime News: महिलेविरोधात एनडीपीएस कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी उझबेकिस्तानच्या महिलेला अटक केली आहे. सिक्वेरी बीच येथे कळंगुट पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत उझबेकिस्तानी महिलेला अटक करण्यात आली. 21 सप्टेंबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केली.

जुमेवा अमीरा (42) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी महिलेचे नाव आहे.

अटक करण्यात आलेल्या उझबेकिस्तानच्या महिलेकडे बेकायदेशीर अमली पदार्थ आढळून आला आहे. हा अमली पदार्थ कोकेन असल्याचा संशय आहे, पोलिसांच्या एका निवेदनात म्हटले आहे.

महिलेजवळ आढलेल्या अमली पदार्थाचे वजन 12.05 ग्रॅम असून, त्याची अंदाजे किंमत 1 लाख 20 हजार रुपये आहे.

कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी सिक्वेरी समुद्रकिनारी येणार असल्याची माहिती पोलिसांना विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सिक्वेरी समुद्रकिनारा परिसरात सापळा रचून संशयित महिलेला अटक केली.

महिलेजवळ एक लाख 20 हजार रुपयांचे अमली पदार्थ मिळाले असून, महिलेविरोधात एनडीपीएस कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT