Mercedes-Benz  Dainik Gomantak
गोवा

ओसामाने साजिदला फसवलं! Airport कंत्राटाचे आमिष देऊन घेतल्या गाड्या, 55 लाखांच्या मर्सिडीजमधून फिरत राहिला मुंबई - गोवा

Fraud Case: साजिदने सुरुवातीला एक कार दिली. त्यानंतर 12 लाख रुपयांना दुसरी कार खरेदी करून दिली. पण बड्या अधिकाऱ्यांसाठी आलिशान कार हवीय, असे सांगितले.

Pramod Yadav

बंगळुरू विमानतळाचा अधिकारी असल्याचे सांगून टॅक्सी ऑपरेटरची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैमानिक आणि इतर अधिकाऱ्यांना विमानतळावर ने-जा करण्यासाठी गाड्यांची गरज असल्याचा दावा केला. तसेच, त्याचे वजन एवढे आहे को तो टॅक्सी ऑपरेटरला विमानतळासाठी लागणाऱ्या गाड्यांचे कंत्राट देईल, असे आश्वासनही दिले.

संशयित ओसामाच्या आमिषाला बळी पडून ऑपरेटरने मर्सिडीजसह तीन गाड्या त्याला दिली. याशिवाय विविध सुरक्षा रक्कम जमा करण्याच्या नावाखाली लाखो रुपयेही दिले.

ओसामा या मर्सिडीजमध्ये गोवा आणि मुंबईत फिरायला जात होता. प्रकरण उघडकीस आल्यानंतर संशयित आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद साजिद हा टॅक्सी व्यावसायिक आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ओसामा नावाच्या व्यक्तीने तो बंगळुरू विमानतळावर एचआर म्हणून काम करत असल्याचे सांगितले.

विमानतळावर दररोज गाड्या लागतात, असे ओसामाने त्याला सांगितले. साजिदने सुरुवातीला एक कार दिली. त्यानंतर 12 लाख रुपयांना दुसरी कार खरेदी करून दिली. पण बड्या अधिकाऱ्यांसाठी आलिशान कार हवीय, असे सांगितले.

साजिदने मित्रांकडून आणि बँकेतून कर्ज घेऊन 55 लाख रुपयांची मर्सिडीजही खरेदी केली. जुलै महिन्यात साजिदकडून ओसामा मर्सिडीज गाडी घेऊन गेला.

मात्र महिना पूर्ण होऊनही भाड्याच्या नावाखाली एक रुपयाही त्याला मिळाला नाही. दरम्यान, ओसामाने स्वत:ला विमानतळ अधिकारी म्हणून घोषित करण्यासाठी जी काही कागदपत्रे दाखवली होती ती बनावट असल्याचे साजिदला समजले.

संशयित ओसामा मर्सिडीजमधून मित्रांसोबत कधी मुंबई तर कधी गोव्याला फिरत असतो, अशी माहितीही साजिदला मिळाली. पीडित साजिद यांच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध बांभूळपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT