Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

Utpal Parrikar: वारंवार खोदकामांमागील गुपित काय?

Utpal Parrikar: उत्पल पर्रीकर यांचा सवाल: स्मार्ट सिटी योजनेतील भोंगळ कारभाराची पाहणी

दैनिक गोमन्तक

Utpal Parrikar: सांतिनेज परिसरात स्मार्ट सिटी योजनेखाली सुरू असलेल्या खोदकामामुळे तेथील व्यापारी व रहिवाशांना धुळीला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात वारंवार खोदकामे करण्यात येत आहेत त्यामागील गुपित काय आहे, असा सवाल उत्पल पर्रीकर यांनी केला.

या कामाचा हिशोब नाही. स्थानिक प्रतिनिधी या कामासंदर्भात असलेल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत आहे. हे सुरू असलेले काम नियोजनाशिवाय करण्यात येत असल्याची टीका त्यांनी या परिसराची पाहणी केल्यानंतर केली.

गेल्यावर्षापासून सांतिनेज परिसरात विविध कामांसाठी रस्ते खोदण्यात येत आहेत. ते खोदकाम बुजवून आता पुन्हा खोदण्यात आले आहेत. वारंवार करण्यात येणाऱ्या खोदकामामुळे येथील वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच त्या भागातील व्यापाऱ्यांना फटका बसत आहे.

सांतिनेज येथील गेल्यावर्षी खोदलेले काम जी२० परिषदेमुळे ते बुजवण्यात आले होते व आता पुन्हा त्या कामाला नव्याने सुरुवात केली आहे. करदात्यांच्या पैशांचा अशा प्रकारे दुरुपयोग केला जात आहे, असे ते म्हणाले.

आतापर्यंत स्मार्ट सिटी योजनेखाली पणजी शहरातील किती कामे झाली आहेत व त्यावर किती खर्च केला आहे, याचा अजूनही हिशोब नाही. कंत्राटदाराला मात्र वारंवार खोदकाम करण्यास तसेच ते बुजवण्यासाठी काम मिळत आहे.

या कामांवर कोणाचेच लक्ष नाही. काम सुरू करण्याची तारीख व पूर्ण करण्याची वेळ याचा काहीच पायपोस नाही, असेही उत्पल म्हणाले उत्तरे हवी

वारंवार ही कामे का करावी लागतात. याबाबत उलगडा करण्याची गरज आहे. ‘नाताळ’नंतर स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकाऱ्यांना भेटून या एकूण कामाची माहिती घेणार आहे, तसेच ही कामे केव्हापर्यंत पूर्ण होतील, याबाबतही विचारणा करणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी प्रत्यक्ष पाहणीवेळी माध्यमप्रतिनिधींना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT