Night Club In Goa: 11 ‘नाईट क्लब’ना ठोकले टाळे

Night Club In Goa: परवाने न घेतल्याचे उघड ः न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
Goa Night Club
Goa Night ClubDainik Gomantak

Night Club In Goa: गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, बार्देश उपजिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलिस यंत्रणेने केलेल्या कारवाईत गुरुवारी रात्री कळंगुटमधील तब्बल 11 ‘डान्स बार’ व ‘पब’ना टाळे ठोकले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीविना हे ‘नाईट क्लब’ चालविले जात होते. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच ‘डान्स बार’च्या विरोधात कारवाईचा इशारा दिला होता.

Goa Night Club
Zuari Bridge: नितीन गडकरी यांच्या हस्ते झुआरी पुलाच्‍या दुसऱ्या बाजूचे लोकार्पण

अधिकाऱ्यांनी किनारपट्टी भागात कार्यरत 13 क्लब व पबपैकी 11 आस्थापनांना टाळे ठोकले. तर दोन आस्थापनांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून क्लब चालवण्याची संमती घेतल्याचे आढळले. त्यात ‘चावला दिलवाला’ व ‘क्लब ताओ’ या आस्थापनांचा समावेश होता.

गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास शासकीय यंत्रणांनी कळंगुट व बागा परिसरातील अशी बेकायदा आस्थापने सील करण्याची प्रक्रिया सुरू केली, जी मध्यरात्रीपर्यंत चालली.

गेल्या आठवड्यात, मुंबई उच्च न्यायालयाने पंचायत संचालक व प्रदूषण मंडळास कळंगुट ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेकायदेशीरपणे डान्स बार व पब चालवणाऱ्या कथित बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यास सांगितले होते.

कळंगुट परिसरात बार अँड रेस्टॉरंटच्या आडून काही ठिकाणी कथित बेकायदेशीर डान्स बार सुरू आहेत, अशी जनहित याचिका खंडपीठात दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणीवेळी संबंधित स्थळी पाहणी करून परवाने नसलेली आस्थापने तत्काळ बंद करा, असे निर्देश खंडपीठाने प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले होते.

दरम्यान, माध्यमांनी कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांना विचारले असता ते म्हणाले की, या कारवाईमुळे पर्यटकांच्या येण्यावर काहीच परिणाम होणार नाही. गोव्यावर प्रेम करणारे पर्यटक कळंगुटला नक्कीच भेट देतील. ‘नाईट क्लब’ सील केले म्हणून पर्यटकांच्या संख्येवर विपरीत परिणाम होणार नाही. तसेच, कळंगुटमधील बेकायदा टाऊट्स यांच्यामुळे पर्यटकांना अधिक त्रास व्हायचा. या कारवाईमुळे राज्यात न्याय व्यवस्था सक्रिय असल्याचा संदेश जाईल.

Goa Night Club
Zuari Bridge: नितीन गडकरी यांच्या हस्ते झुआरी पुलाच्‍या दुसऱ्या बाजूचे लोकार्पण

टाळे ठोकलेले क्लब व पब

  • डेव्हिल्स क्लब,

  • नॉर्म्स पब,

  • ब्लॅक हार्ट,

  • शील्ड/नेक्स लेव्हल,

  • थ्री किंग्स,

  • मेहफिल,

  • ३९ स्टेप्स,

  • पॉश नोश,

  • ट्रॉपिकल २४/७,

  • कोड्डा,

  • प्लांटेन लीफ रेस्ट.

ही कारवाई खूप पूर्वीच होणे गरजेचे होते. ऑगस्टपासून कळंगुट ग्रामस्थांनी संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून किनारी भागात चाललेले गैरप्रकार रोखण्यासंदर्भात विनंती केली होती. मात्र, तेव्हा यंत्रणांकडून आवश्यक सहकार्य मिळाले नाही, परंतु मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर कारवाई होतेय हे समाधानकारक आहे. - जोसेफ सिक्वेरा, सरपंच, कळंगुट\

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com